Maharashtra Politics: राम मंदिर सोहळ्याआधी उद्धव ठाकरेंवर भाजपची टीका; ट्वीट करत विचारले ६ मोठे प्रश्न

Thackeray vs BJP: राम मंदिर सोहळ्याआधी भाजपने उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत खोचक सवाल विचारले आहे.
Uddhav Thackeray vs BJP Latest News
Uddhav Thackeray vs BJP Latest News SAAM TV
Published On

Uddhav Thackeray vs BJP Latest News

अयोध्येत आज प्रभु रामचंद्राच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा केली जाणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील दिग्गज नेत्यांसह कलाकार मंडळी उपस्थित राहणार आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या सोहळ्याकडे पाठ फिरवली आहे. हा भाजपचा राजकीय कार्यक्रम असून मी नंतर अयोध्या दर्शनाला जाणार असं ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Uddhav Thackeray vs BJP Latest News
Ram Mandir News: अयोध्येतील भव्य राम मंदिरात आज विराजमान होणार रामलल्ला; संपूर्ण देशात भक्तिमय वातावरण

एकीकडे अयोध्येत राम मंदिराचा सोहळ्याचा कार्यक्रम होत असताना, दुसरीकडे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज नाशिक येथील काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास ते गोदावरी नदीची आरती देखील करणार आहेत. दरम्यान, यावरून भाजपने उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत खोचक सवाल विचारले आहे.

रामभक्तांच्या रक्ताने हात माखलेल्या मुलायमसिंग यादव यांच्या समाजवादी सोबत मैत्री करणाऱ्या ढोंगी भक्तांना आता काळाराम पावणार का? असा खोचक सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्वीट करत उपस्थित केला आहे. (Latest Marathi News)

आज जेव्हा देश दिवाळी साजरी करतोय, तेव्हा उबाठा शाखा अंधारात आणि गोदातिरावर थयथयाट, असा टोलाही शेलार यांनी लगावला आहे. शेलार यांच्या या टीकेमुळे ठाकरे गट आक्रमक होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांचा आजपासून नाशिक दौरा सुरू होत आहे. नाशिकमध्ये दाखल होताच उद्धव ठाकरे काळाराम मंदिरात सायंकाळी ६ वाजता पूजा तसेच आरती करणार आहे. यानंतर ते हजारो शिवसैनिकांसह सायंकाळी ७ वाजता रामपुंड पंचवटी येथे गोदावरी नदीची महाआरती करणार आहे.

Uddhav Thackeray vs BJP Latest News
Ram Mandir : राम मंदिर लोकार्पण सोहळ्याला लालकृष्ण अडवाणी जाणार नाहीत; शेवटच्या क्षणी रद्द केला कार्यक्रम

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com