Ram Mandir : राम मंदिर लोकार्पण सोहळ्याला लालकृष्ण अडवाणी जाणार नाहीत; शेवटच्या क्षणी रद्द केला कार्यक्रम

Ram Mandir PranPratisthan Sohla : लालकृष्ण अडवाणी यांनी राम मंदिर उभारणे ही केवळ भाजपची इच्छा नसून त्यांचे ध्येय असल्याचे वक्तव्य केले होते. त्यासाठी त्यांनी बराच काळ संघर्ष केला आणि प्रयत्न केले.
Ram Mandir PranPratisthan Sohla
Ram Mandir PranPratisthan SohlaSaam TV
Published On

Ayodhya Ram Mandir :

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी राम मंदिरातील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत. राम मंदिर लोकार्पण सोहळ्यासाठी लालकृष्ण अडवाणी यांना निमंत्रित करण्यात आले होते. ते कार्यक्रमाला येतील असं सर्वांना वाटत होतं. मात्र शेवटच्या क्षणी त्यांनी अयोध्येला जाणे रद्द केले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Ram Mandir PranPratisthan Sohla
Ram Mandir News: अयोध्येतील भव्य राम मंदिरात आज विराजमान होणार रामलल्ला; संपूर्ण देशात भक्तिमय वातावरण

लालकृष्ण अडवाणी हे राम मंदिर आंदोलनातील प्रमुख चेहरा होते. त्यासाठी त्यांनी देशभर रथयात्रा काढली होती. अडवाणी यांची प्रकृती या कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याचे प्रमुख कारण आहे. कडाक्याची थंडी हे देखील यामागचे एक कारण असल्याचे सांगितले जात आहे.

लालकृष्ण अडवाणी यांनी राम मंदिर उभारणे ही केवळ भाजपची इच्छा नसून त्यांचे ध्येय असल्याचे वक्तव्य केले होते. त्यासाठी त्यांनी बराच काळ संघर्ष केला आणि प्रयत्न केले. (Latest Marathi News)

वय आणि प्रकृतीचे कारण सांगून राम मंदिर ट्रस्टने म्हटले होते की, मुरली मनोहर जोशी आणि अडवाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे. राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितले की, दोघांनाही या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले असून त्यांनी निमंत्रण स्वीकारलेही आहे.

Ram Mandir PranPratisthan Sohla
Ram Mandir: परदेशातही रामनामाचा गजर! राम मंदिर लोकार्पण सोहळ्याचं उत्साहात सेलिब्रेशन

रामनगरी अयोध्येत उत्सवाचे वातावरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिरात रामलल्लाचा अभिषेक सोहळा पार पडणार आहेत. राम मंदिरासह संपूर्ण अयोध्या नगरी यासाठी सजवण्यात आली आहे. देशभरातून विविध क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती अयोध्येत पोहोचत आहेत. राम नगरीत उत्सवाचे वातावरण आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com