Ram Mandir: परदेशातही रामनामाचा गजर! राम मंदिर लोकार्पण सोहळ्याचं उत्साहात सेलिब्रेशन

Ram Mandir Pran Pratishta: आज रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा अयोध्येत पार पडतोय. पण याचा जल्लोष मात्र परदेशातही पाहायला मिळतोय. परदेशात विविध ठिकाणी भारतीय आपला आनंद साजरा करत आहेत.
Ayodhya Ram Mandir
Ayodhya Ram MandirSaam tv

Celebration Of Ram Mandir Pran Pratistha

रामभक्त फक्त देशातच नाही, तर परदेशातही आहेत. संपूर्ण जगात राम मंदिर अभिषेक सोहळा उत्साहात (Ram Mandir Pran Pratishta) साजरा होतोय. डोळ्यांचं पारणं फेडणारा हा क्षण आहे. सगळ्यांच्या नजरा या कार्यक्रमाकडे आहेत, रामलल्ला केव्हा त्यांच्या स्थानी विराजमान होतात, याची संपूर्ण जग वाट पाहतंय. परदेशातही या उत्सवाची धूम सुरू आहे. (latest ram mandir update)

परदेशात विविध ठिकाणी रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आनंद व्यक्त केला जातोय. अनेक भारतीय विदेशात हा जल्लोष साजरा करत आहेत. समाज माध्यमांवर याचे व्हिडिओ समोर आले आहेत. परदेशातही रामनामाचा गजर होत आहे. राम मंदिर लोकार्पण सोहळ्याचं उत्साहात सेलिब्रेशन पार पडताना दिसतंय.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भारतीय नागरिकांची मोठी रॅली

अमेरिकेतील (US) शेकडो मंदिरांमध्ये आजच्या राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याची (Ram Mandir Pran Pratishta) तयारी झालीय. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये हा उत्सव साजरा करण्यात आला आहे. याचा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात धुमाकुळ घालतोय.

'जय श्री राम'ची धून केवळ भारतातच नाही तर जगाच्या अनेक भागांतून ऐकू येत आहे. युनायटेड स्टेट्समधील सॅन फ्रान्सिस्कोमध्ये राम मंदिराचा अभिषेक समारंभाच्या आधी भव्य उत्सव साजरा झालाय. गोल्डन सिटीमधील भारतीय नागरिकांनी मोठी रॅली काढली होती. प्रमुख व्यावसायिक ठिकाणी भगवे ध्वज घेऊन त्यांनी फेरी काढली. यावेळी त्यांनी पारंपारिक पोशाख परिधान केले होते.

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा जल्लोष

आयर्लंडमध्ये राम मंदिराचा (Ram Mandir Pran Pratishta) उत्सव साजरा करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये सर्व नागरिकांनी पारंपारिक वेषात हा उत्सव साजरा केल्याचं दिसंतय. 'बजरंग बली की जय आणि जय श्री राम'च्या जयघोष अवघ्या आयर्लंडमध्ये गुंजल्याचं दिसतंय.

टाइम्स स्क्वेअरवर भव्य राम मंदिर (ram mandir) प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा जल्लोष पाहायला मिळाला. 'राम आयेंगे' या गीतावर एकच ठेका रामभक्तांनी धरला होता. खरं तर संपूर्ण जग या सोहळ्याचा आनंद साजरा करत आहे.

Ayodhya Ram Mandir
Ram Mandir : राम भक्तांनी रामलल्लाला काय- काय दिलं गिफ्ट; जाणून घ्या गिफ्टचे वैशिष्ट्ये

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com