Mumbai Local Train: राम मंदिर लोकार्पणाच्या दिवशीच मुंबईकरांची तारांबळ; पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Mumbai Local Train News: पश्चिम रेल्वे मार्गावर लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे चर्चेगेटच्या दिशेने जाणाऱ्या जलद गाड्या ३० ते ४० मिनिटे उशिराने धावत आहेत.
Mumbai Local Latest News
Mumbai Local Latest NewsSaam TV

Mumbai Local Train Latest News

अयोध्येत आज प्रभु श्रीरामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा संपन्न होणार आहे. यानिमित्ताने देशभरासह राज्यात उत्साहाचं वातावरण आहे. मुंबईत देखील मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केला जात सुट्टी असल्याने भल्यापहाटे मुंबईकर घराबाहेर पडले आहेत. मात्र, पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने त्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Mumbai Local Latest News
Ram Mandir News: अयोध्येतील भव्य राम मंदिरात आज विराजमान होणार रामलल्ला; संपूर्ण देशात भक्तिमय वातावरण

राम मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त आज देशभरातील शाळा तसेच सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे भल्यापहाटे नागरिक दर्शनसाठी घराबाहेर पडत आहे. मुंबईकर देखील सिद्धीविनायक तसेच महालक्ष्मीचे दर्शन घेण्यासाठी बाहेर पडले आहेत. मात्र, त्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. (Latest Marathi News)

पश्चिम रेल्वे मार्गावर लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे चर्चेगेटच्या दिशेने जाणाऱ्या जलद गाड्या ३० ते ४० मिनिटे उशिराने धावत आहेत. सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे पश्चिम रेल्वेच वेळापत्रक कोलमडलं आहे. दरम्यान, जलद गाड्या सध्या स्लो ट्रॅकवरुन वळवण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रशासनाकडून सध्या बिघाड दुरुस्त करण्याचे काम सुरु आहे.

Mumbai Local Latest News
Pandharpur News: भगव्या पोशाखात खुललं सावळ्या विठुरायाचे रुप; अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त पंढरपूर सजले

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com