अयोध्या नगरीमध्ये प्रभू श्रीराम मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडला. या ऐतिहासिक सोहळ्याचा जल्लोष अन् उत्साह सर्वत्र पाहायला मिळत आहे. अवघ्या देश आज 'राममय' झाला असून राजनामाच्या जयघोषाने आसमंत दुमदुमत आहे. या सोहळ्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी उपस्थितांना संबोधित केले.
काय म्हणाले मोहन भागवत?
"आजचा आनंद शब्दात वर्णन करता येणार नाही. हा आनंद मिळवण्यासाठी गेल्या 500 वर्षात किती लोकांनी रक्त आणि घाम गाळला. आम्ही सर्व त्यांचे ऋणी आहोत. रामलल्लासोबत भारताचा स्वाभिमान परत आला आहे. देशभरातील छोट्या मंदिरांमध्ये रामभक्तांमध्ये उत्साहाची लाट आहे. मोदींनी (PM Narendra Modi) आजच्या पूजेसाठी कडक उपवास ठेवला आहे, ते महान तपस्वी आहेत," अशा शब्दात त्यांनी कौतुक केले.
महात्मा गांधींच्या विचारांचा दिला दाखला..
"महात्मा गांधी म्हणाले होते की पृथ्वी प्रत्येक माणसाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेशी आहे, ती प्रत्येकाचा लोभ पूर्ण करू शकत नाही. याचा अर्थ असा आहे की आपण लोभी नसावे आपण शिस्तबद्ध राहिले पाहिजे. समाज जीवनात नागरी शिस्तीचे पालन करणे म्हणजे देशभक्ती असे म्हणत सर्वांना एकात्मतेचा संदेश देत सर्वांनी वाणी, मन आणि वचनाने एक होण्याचे आवाहनही सरसंघचालकांनी केले.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
देशवासियांना आवाहन...
पंतप्रधानांनी तप केला, आता आपल्यालाही तप करावा लागणार आहे. आपसातील भांडण मिटवावी लागतील. परस्परातील मतभेद, वाद, भांडण सोडून द्याव लागेल. रामराज्यात नागरिक ज्या प्रमाणेच आचरण करायचे. समन्वयाने काम कराव लागेल. सेवा परोपकार भावना महत्त्वाच्या आहेत. सरकारच्या योजनांनी गरीबांना दिलासा मिळतोच आहे. पण जिथे दु:ख, पीडा आहे, तिथे आपण मदतीला गेल पाहिजे, असा संदेश मोहन भागवत यांनी दिला. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.