Ram Mandir Pran Ppratishtha : भारत का बच्चा बच्चा...; श्री रामप्रभूंच्या प्राणप्रतिष्ठेनंतर महाराष्ट्रात फटाके फाेडून, मिठाई वाटून जल्लाेष

शोभायात्रेत श्रीराम, लक्ष्मण, सीता यांचा देखावा सादर करण्यात आले.
ayodhya ram mandir inauguration celebration in various parts of maharashtra
ayodhya ram mandir inauguration celebration in various parts of maharashtrasaam tv

भारत नागणे / सचिन कदम / राजेश काटकर

Ram Mandir Udghatan :

अयोध्येत (Ayodhya) आज रामलल्लाची (ram lalla) प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर देशभरात रामभक्तांनी जल्लाेष केला. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात राम नामाचा जयघाेष करीत भाविकांनी फटाके फाेडले. पंढरपूरात रामभक्तांना 200 किलाे मिठाईचे वाटप करण्यात आले. अयाेध्येतील साेहळा भक्तांना थेट पाहता यावा यासाठी महाडला स्क्रीनची व्यवस्था हाेती तर परभणी, गाेरेगाव येथे श्रीराम शाेभायात्रा काढण्यात आली. (Maharashtra News)

पंढरपूर : दोनशे किलो मिठाईचे वाटप

पंढरपुरातील (pandharpur) उत्पात गल्ली येथे माजी नगरसेवक सुनील डोंबे यांच्या हस्ते प्रभू श्रीराम मूर्तीचे पूजन केले. यावेळी येथील‌ तरूणांनी जय श्रीराम असा जयघोष करत, रामाच्या भक्तीगितावर ठेका धरला. महिलांनी सहभागी होत या सोहळ्याचा आनंद लुटला.

यावेळी राम भक्तांना‌ दोनशे किलो मिठाईचे वाटप केले. शहरातील विविध मंडळांच्या वतीने श्रीरामाच्या प्रतिमेची वाजतगाजत मिरवणूक काढली. अवघी पंढरी नगरी श्रीरामाच्या जयघोषांनी दुमदुमून गेली आहे.

ayodhya ram mandir inauguration celebration in various parts of maharashtra
HSC Exam Hall Ticket : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, सोमवारपासून मिळणार हॉल तिकीट; जाणून घ्या सूचना

गोरेगाव : श्रीरामांची पालखी मिरवणूक व शोभायात्रा

रायगड (raigad) जिल्ह्याच्या ग्रामीण भागात देखील उत्साह आहे. पहाटे राममंदिरामध्ये काकड आरतीने कार्यक्रमास सुरुवात झाली. माणगाव तालुक्‍यातील गोरेगाव शहरातून श्रीरामांची पालखी मिरवणूक व शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत महिलांसह आबालवृद्धांनी मोठी उपस्थिती लावली.

जुनी पेठ, भैरवनाथ मंदिर, गोरोबा नगरसह मुख्य बाजारपेठ ते राजमाता जिजाऊ मैदान अशी निघालेल्या शोभायात्रेत महिलांनी फेर धरला. वारकरी देखील यात सहभागी झाले होते.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

साेहळा थेट पाहण्यासाठी महाडला स्क्रीनची व्यवस्था

महाडमधील (mahad) राम मंदिरात जल्लोश करण्यात आला. सकाळ पासून मंदिरामध्ये विधीवत पुजा होम हवनाचे आयोजन करण्यात आले होते. श्रीराम मुर्ती प्राण प्रातिष्ठापनेच्या मुहूर्तावर उपस्थितांनी जय श्री राम आणि मंत्र घोष केला. अयोध्येत संपन्न होणारा सोहळा पहाता यावा यासाठी मंदिरा बाहेर स्क्रीन लावण्यात आली होती.

ayodhya ram mandir inauguration celebration in various parts of maharashtra
Ram Mandir Inauguration Live Telecast: महाराष्ट्रातील चित्रपटगृहांत दाखविला जाणार राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळा: उदय सामंत

परभणीत शाेभायात्रा

परभणीच्या पूर्णा शहरात प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठान सोहळ्याचे औचित्य साधून पूर्णा शहरात प्रभू श्रीरामाची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत मोठ्या संख्येने महिला रामभक्त सहभागी झाले होते.

शोभायात्रेमध्ये प्रभू श्रीराम लक्ष्मण सीता यांची देखावे सादर करण्यात आले. त्यावेळी श्री हनुमान यांची वेशभूषा मुलांनी सहभाग घेतला. बागेश्वर बाबा व तसेच योगी आदित्यनाथ यांचे देखावे सुद्धा सादर करण्यात आले. त्यावेळी श्रीराम यांच्या जयघोषाने शहर पूर्ण दुमदुमून गेले.

Edited By : Siddharth Latkar

ayodhya ram mandir inauguration celebration in various parts of maharashtra
Mandhardevi Yatra 2024 : भाविकांनाे! मांढरदेव गडावर काळूबाईच्या यात्रेला निघालात? जाणून घ्या वाहतुकीतील बदल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com