Shirdi Saibaba : चांदीचा अष्टलक्ष्मी दिवा भक्ताकडून साई चरणी अर्पण; श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे साधले औचित्य

Shirdi News : शिर्डीच्या साईबाबांचा भक्त देशातच नव्हे तर विदेशात देखील आहे. राज्यभरातील मंदिरामध्ये भाविकांची रीघ सुरूच असते. अशात साईचरणी देखील लाखो भक्त लीन होत असून दानपेटीतही भरघोस दान दिल जात आहे.
Shirdi Saibaba
Shirdi SaibabaSaam tv
Published On

सचिन बनसोडे 

शिर्डी (अहमदनगर) : शिर्डीच्या साईबाबांना भक्तांकडून रोख रकमेसह दागिने, सोने- चांदी अर्पण केले जात असते. (Shirdi) यामुळे संस्थानला मोठ्या प्रमाणात देणगी मिळत असते. अशाच प्रकारे एका भक्ताने चांदीचा (Saibaba) अष्टलक्ष्मी दिवा साईचरणी अर्पण करत संस्थानकडे सुपूर्द केला आहे. (Live Marathi News)

Shirdi Saibaba
Ram Mandir : प्रभू रामचंद्रांच्या जगातील सर्वात लहान लाकडी पादुका; रुद्राक्षावर साकारली श्रीरामांची प्रतिमा

देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळख असलेले शिर्डीच्या साईमंदिरात रोजच हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात.  शिर्डीच्या साईबाबांचा भक्त देशातच नव्हे तर विदेशात देखील आहे. राज्यभरातील मंदिरामध्ये भाविकांची रीघ सुरूच असते. अशात साईचरणी देखील लाखो भक्त लीन होत (Saibaba Sansthan) असून दानपेटीतही भरघोस दान दिल जात आहे. काही भाविक दागिने अर्पण करत असतात. त्यानुसार मुंबईच्या एका भाविकाने चांदीचा दिवा अर्पण केला आहे.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Shirdi Saibaba
Jalgaon Accident : हनुमान दर्शनावरून परताना मोटारसायकलला अपघात; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर

२ किलोंचा दिवा दान 
मुंबई येथील देणगीदार साई भक्त अनिल जेठवाणी यांनी श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधत साई संस्थानला दोन किलो वजनाचा चांदीचा अष्टलक्ष्मी दिवा देणगी स्वरुपात दिला आहे. जेठवानी यांनी सपत्नीक साईबाबांचे दर्शन घेऊन श्रीगणेश आणि अष्टलक्ष्मी कोरलेला हा नक्षीदार दिवा त्यांनी साईबाबा संस्थानच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com