Ram Mandir Ayodhya: राम मंदिर लोकार्पण सोहळ्याचा उत्साह, CM शिंदेंनी ढोल वाजवत साजरा केला आनंद; खासदार-आमदारांचाही तुफान डान्स

Ram Mandir Ayodhya News: राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त लोकप्रतिनिधी खासदार, आमदारांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. तर दुसरीकडे मुख्यमंत्री शिंदे यांनी ढोल वाजवत आनंद लुटला.
Ram Mandir Ayodhya
Ram Mandir AyodhyaSaam tv
Published On

Ram Mandir Ayodhya:

आज सोमवारी २२ जानेवारीला अयोध्येत रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. या सोहळ्याचा उत्साह सर्वसामान्य व्यक्तींपासून लोकप्रतिनिधीमध्येही पाहायला मिळाला. राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त लोकप्रतिनिधी खासदार, आमदारांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. तर दुसरीकडे मुख्यमंत्री शिंदे यांनी ढोल वाजवत आनंद लुटला. (Latest Marathi News)

अयोध्येतील श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्याचा आनंद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोपिनेश्वर मंदिरामध्ये ढोल वाजवत आनंद साजरा केला. मुख्यमंत्री शिंदे हे अयोध्येतील सोहळ्याला हजर नव्हते. मात्र, त्यांच्या गटाचे आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधींना घेऊन राम दर्शनाला पुढच्या महिन्यात जाणार आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भंडाऱ्यात खासदारांचा तुफान डान्स

२२ जानेवारी रोजी अयोध्या येथे रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना झाली असून याच पार्श्वभूमीवर भंडारा येथील तहसील कार्यालय परिसरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. हा आनंदोत्सव भाऊराव मित्र परिवारातर्फे साजरा करण्यात आला.

यावेळी मित्रपरिवाराच्या वतीने श्रीरामाच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित मित्र मंडळांनी श्रीरामाच्या गाण्यांवर नृत्य केले. यावेळी श्रीरामाच्या जीवनावर आधारित गाण्यांवरून नृत्य सुरू असतानाच खासदार मेंढे आणि आमदार नरेंद्र भोंडेकर यांनाही मोह आवरला नाही. त्यांनी जोरदार डान्स केला.

Ram Mandir Ayodhya
Nanded News: 'मजबुरीने कोणी येत असेल तर स्वागत...' अशोक चव्हाणांच्या बॅनरवरुन प्रताप चिखलीकरांचा टोला

शोभायात्रेत रामलल्लाच्या गाण्यावर मंत्री अतुल सावेंचा ठेका

छत्रपती संभाजी नगरात मंत्री अतुल सावे यांनी औरंगपुरा येथे काढण्यात आलेल्या शोभा यात्रेदरम्यान रामलल्लाच्या गाण्यावर नाचत आपला आनंद साजरा केला. यावेळी त्यांनी हातात भगवा ध्वज फिरवला.

तसेच प्रभू श्रीराम तसेच रामायणातील पात्रांची वेशभूषा धारण केलेल्या लहान लहान मुलांना लाडू भरवला. त्यांनी राम मंदिर सोहळ्याचा उत्साह मोठ्या आनंदात साजरा केला. सकाळपासूनच छत्रपती संभाजी नगर शहरामध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com