Ambernath Shiva Mandir Saam Tv
महाराष्ट्र

Shiva Mandir: अंबरनाथच्या शिवमंदिरावरील शिल्प निखळले; मंदिरात नारळ फोडण्यास बंदी, तर पूजेअर्चेवर निर्बंध

Ambernath Shiva Mandir: अंबरनाथच्या शिवमंदिरावरील शिल्प निखळले आहेत. त्यामुळं प्राचीन शिवमंदिरात नारळ फोडण्यास बंदी घातली गेली आहे. हे आदेश पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी संबंधितांना दिले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Ambernath Shiva Mandir Sculpture Dislodged

अंबरनाथमध्ये एक हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन संस्कृतीचा पुरावा असलेले शिवमंदिर (Ambernath Shiva Mandir) आहे. हे मंदिर त्याच्या हेमाडपंथी शैलीसाठी ओळखलं जातं. दगडांवर सुंदर कोरीव काम केलेले आहे. भगवान शंकराचा आशीर्वाद घेण्यासाठी शिवभक्त मोठ्या श्रद्धेने येथे येतात. श्रावण महिन्यात मंदिर गर्दीने फुलून जाते. परंतु याच शिवभक्तांना आता मंदिरात पूजा करताना काही निर्बंध पाळावे लागणार आहेत.  (Latest Marathi News)

अंबरनाथमधील (Ambernath) 21 व्या शतकातील प्राचीन शिवमंदिराला पडझडीचा धोका निर्माण झाला आहे. ज्येष्ठ प्राच्यविद्या अभ्यासाक डॉ. कुमुद कानेटकर यांनी याकडे पुरातत्व विभागाचे लक्ष वेधलंय. त्यानंतर विभागाकडून तातडीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शिवमंदिरात नारळ फोडण्यास बंदी

अंबरनाथच्या शिवमंदिरावरील शिल्पांची झीज होत (Ambernath Shiva Mandir Sculpture) आहे. त्यामुळं प्राचीन शिवमंदिरात नारळ फोडण्यास बंदी घातली गेली आहे. हे आदेश पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी संबंधितांना दिले आहेत.

अंबरनाथमधील शिलाहार काळातील उत्कृष्ट स्थापत्य कलेचा वारसा असलेल्या शिवमंदिराच्या शिल्पांची झिज होत आहे. तसेच त्यावरील काही शिल्पं निखळून पडल्याचं समोर आलं (Shiva Mandir Puja) आहे. ज्येष्ठ प्राच्यविद्या अभ्यासक डॉक्टर कुमुद कानिटकर यांनी नुकतीच शिव मंदिराला दिलेल्या भेटीदरम्यान ही चिंताजनक बाब समोर आली आहे.

भारतीय पुरातत्व विभागाने केली पाहणी

याबाबत त्यांनी समाज माध्यमांवर नाराजी देखील व्यक्त केलीय. त्यानंतर भारतीय पुरातत्व विभागाने (Archeology Department) मंदिर परिसरात धाव घेत पाहणी केली. पुरातत्व विभागाने पाहणी केल्यानंतर मंदिराच्या आवारातील ध्वनिक्षेपण यंत्रणा, वास्तूवरील शिल्पांवर तसेच मूर्तीवर होणारा दुग्धाभिषेक, कुठेही फोडण्यात येणारे नारळ, मंदिराच्या आत होणारे होम हवन, पूजा, अर्चना यावर निर्बंध लावण्यात आले आहेत.

शिवभक्तांना (Shiva Mandir) आता या नियमांचं पालन करावं लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यामध्ये मतदानाच्या दिवशी PMPMLच्या वाहतुकीमध्ये बदल, असा कराल प्रवास

Maharashtra News Live Updates: सांगोल्यातील अपक्ष उमेदवारावर पाठिंब्यासाठी दबाव; निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे तक्रार

Pune Crime : कपड्याच्या दुकानातून पावणे चार लाखांची रोकड लंपास; चोरटे सीसीटीव्हीत कैद

Women Qualities: महिलांच्या या सवयीचं पुरूषांकडून होतं कौतुक, जिंकतात हृदय

Parenting Tips: मुलांना शिस्त लावायची आहे? मग पालकांनी ही चूक कधीच करु नका अन्यथा...

SCROLL FOR NEXT