Pune News: पुण्यामध्ये मतदानाच्या दिवशी PMPMLच्या वाहतुकीमध्ये बदल, असा कराल प्रवास

Pune PMPML Travel: पुणे शहरातील वाहतूक सुरक्षित आणि सुरळीतपणे सुरू राहण्याकरीता १९ आणि २० नोव्हेंबर २०२४ रोजी स्वारगेट वाहतूक विभागांतर्गत वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.
Pune News: पुण्यामध्ये मतदानाच्या दिवशी PMPMLच्या वाहतुकीमध्ये बदल, असा कराल प्रवास
PMPMLSaam TV
Published On

विधानसभा निवडणुक २०२४ च्या कामकाजाच्या अनुषंगाने गणेश कला क्रीडा रंगमंच स्वारगेट येथून मतदान प्रक्रियेच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या पीएमपीएमएल बसेसच्या वाहनतळाकरीता जागा उपलब्ध व्हावी. तसंच पुणे शहरातील वाहतूक सुरक्षित आणि सुरळीतपणे सुरू राहण्याकरीता १९ आणि २० नोव्हेंबर २०२४ रोजी स्वारगेट वाहतूक विभागांतर्गत वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. याची पुणेकरांनी दखल घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

स्वारगेट ते नेहरु स्टेडियम दरम्यानचे रस्त्यावर १९ नोव्हेंबर रोजी ६ वाजल्यापासून ते दुपारी १ वाजेपर्यंत तसेच २० नोव्हेंबर रोजी सांय ६ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत वाहतुकीमध्ये पुढीलप्रमाणे बदल करण्यात येत आहे. जेधे चौकातून सारसबागेकडे जाणारी वाहतूक हॉटेल नटराजकडील लेनवर प्रवेश बंद येणार आहे. नागरिकांना जेधे चौकातून सारसबागेकडे जाण्यासाठी ओव्हरब्रिज खालील डावीकडील लेनने इच्छित स्थळी जाता येणार आहे.

Pune News: पुण्यामध्ये मतदानाच्या दिवशी PMPMLच्या वाहतुकीमध्ये बदल, असा कराल प्रवास
Pune : पुण्यात जोरदार राडा, व्यवहारे अन् धंगेकर आमनेसामने, कार्यकर्त्यांमध्ये टशन!

सोलापूर रोडने जेधे चौक अंडरपासने सारसबागेकडे जाण्यास प्रवेश बंद करण्यात येणार आहे. नागरिकांना सोलापूर रोडने येणाऱ्या वाहनांनी जेधे चौक ओव्हर ब्रीज खालील डावीकडे वळण घेऊन होल्गा चौकामध्ये उजवीकडे वळण घेवुन इच्छित्त स्थळी जाता येणार आहे, असे पुणे शहर वाहतूक शाखेचे उप आयुक्त अमोल झेंडे यांनी कळविले आहे.

Pune News: पुण्यामध्ये मतदानाच्या दिवशी PMPMLच्या वाहतुकीमध्ये बदल, असा कराल प्रवास
Pune Crime: आधी अपहरण, नंतर निर्घृण हत्या अन् मृतदेहाचे तुकडे; बांधकाम व्यवसायिकाच्या हत्येने पुणे हादरले

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com