विधानसभा निवडणूकीची धामधूम सुरु आहे. सोलापूर दक्षिणमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीत महाभारत रंगलंय.. नेमकं सोलापूर दक्षिणचं राजकीय आणि जातीय समीकरण कसं आहे?
सोलापूर दक्षिणचं महाभारत !
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर प्रत्येक मतदारसंघात महाभारतं घडतंय..सोलापुर दक्षिणेत भाजपने विद्यमान आमदार सुभाष देशमुखांना उमेदवारी देत रिंगणात उतरवलंय.. तर ठाकरे गटाने अमर पाटलांना उमेदवारी दिलीय.मात्र बंडखोरांनी महायुती आणि महाविकास आघाडीचं टेंशन वाढवलंय..शिवसैनिकांच्या आशीर्वादाने अमर पाटलांनी विजयाचा दावा केलाय. तर सुभाष देशमुखांनी 4 नोव्हेंबरपूर्वी महायुतीतील बंडखोरी शमणार असल्याचा विश्वास व्यक्त केलाय..
काँग्रेसचा बालेकिल्ला 2014 च्या निवडणुकीत भाजपने खेचून आणला. त्यानंतर सलग 10 वर्षे सुभाष देशमुख सोलापूर दक्षिणचं प्रतिनिधीत्व करत आहेत. मात्र 2019 मधील मतांचं गणित नेमकं कसं होतं? पाहूयात...
2019 मधील मतांचं गणित
सुभाष देशमुख, आमदार,भाजप, 87,223
बाबा मिस्त्री, काँग्रेस, 57,976 मतं
29 हजार 247 मतांनी देशमुख विजयी
काँग्रेसने दिलीप मानेंना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र ऐनवेळी एबी फॉर्म न आल्याने दिलीप मानेंनी अपक्ष लढण्याचा निर्धार केलाय.. तर इतरही बंडखोर निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.
मविआ-महायुतीत बंडखोरीला उधाण
काँग्रेसचे धर्मराज कडादी अपक्ष रिंगणात उतरले आहेत.काँग्रेसकडून नाव जाहीर होऊन एबी फॉर्म न मिळालेले दिलीप माने अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. उद्योजक महादेव कोगणूरेंना मनसेची उमेदवारी मिळाली आहे. बाबा मिस्त्रींना प्रहार जनशक्ती पक्षाकडून तिकीट मिळाले आहे.
सोलापूर दक्षिण हा बहुभाषिक मतदारसंघ असल्याने जातीय समीकरण महत्वाचं आहे.
सोलापूर दक्षिणमधील जातीय समीकरण
लिंगायत समाज - 35%
धनगर समाज - 25%
मुस्लिम - 15%
मराठा - 10%
SC आणि ST - 15%
सुभाष देशमुखांच्या मतदारसंघातून प्रणिती शिंदेंना 9 हजार 400 मतांचं लीड मिळालं. तर महाविकास आघाडीने ठाकरे गटाच्या अमर पाटलांना उमेदवारी दिल्याने बंडखोरी शमवण्याचं मोठं आव्हान महाविकास आघाडीसमोर असणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला बंडखोरी शमवण्यात यश येणार का? यावर सोलापूर दक्षिणचा आमदार ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.