Maharashtra Politics: काँग्रेस पुन्हा फुटणार? कोल्हापुर, मुंबईत काँग्रेसला धक्के; विधानसभेनंतर राजकीय भूकंप होणार?

Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीच्या प्रचार रणधुमाळीला जोर येणार असतानाच काँग्रेसला फुटीचं ग्रहण लागलंय. मुंबई आणि कोल्हापूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलाय.
काँग्रेस पुन्हा फुटणार? कोल्हापुर, मुंबईत काँग्रेसला धक्के; विधानसभेनंतर राजकीय भूकंप होणार?
Nana Patole, Prithviraj Chavan, Balasaheb ThoratSaam Tv
Published On

लोकसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक जागा जिंकलेल्या काँग्रेसनं विधानसभेलाही मविआनं सर्वाधिक जागा पदरात पाडून घेतल्या. मात्र हक्काच्या जागांवर काँग्रेसला पाणी सोडावं लागलं. यावरुन पक्षात नाराजी उफाळली. त्यातून पुन्हा पक्षांतर आणि बंडखोरीला ऊत आलाय. त्याला कारण ठरलंय ते रवी राजा यांचा भाजप प्रवेश.

मुंबई महानगरपालिकेतील काँग्रेसचा प्रमुख चेहरा आणि ज्येष्ठ नेते रवी राजांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलीय. तर दुसरीकडे कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून उमेदवारी कापल्यानं विद्यमान आमदार जयश्री जाधवांनी काँग्रेसला रामराम ठोकत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. त्यामुळे लोकसभेत दमदार कामगिरी करणाऱ्या काँग्रेसला ऐन विधानसभेच्या तोंडावर फुटीचं ग्रहण लागलंय. याचबद्दल बोलताना रवी राजा म्हणाले आहेत की, माझ्या अनुभवाचा उपयोग केला नाही.

काँग्रेस पुन्हा फुटणार? कोल्हापुर, मुंबईत काँग्रेसला धक्के; विधानसभेनंतर राजकीय भूकंप होणार?
Assembly Election 2024: राज्यात वयाची शंभरी पार केलेले 47 हजार मतदार, महिला - पुरुषांची संख्या किती? निवडणूक आयोगाने दिली A टू Z माहिती

कोण आहेत रवी राजा?

रवी राजा हे काँग्रेस पक्षातून पाच वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. तब्बल 25 वर्षांचा नगरसेवकपदाचा त्यांना अनुभव आहे. ते मुंबई महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेतेही राहिले आहे. सायन-कोळीवाडा मतदारसंघात त्यांचा चांगला प्रभाव आहे.

दुसरीकडे, कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून उमेदवारी कापल्याने विद्यमान आमदार जयश्री जाधव यांनी काँग्रेसला रामराम ठोकत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. कोल्हापुर काँग्रेसमध्ये नेमकं काय घडलं, हे जाणून घेऊ...

काँग्रेस पुन्हा फुटणार? कोल्हापुर, मुंबईत काँग्रेसला धक्के; विधानसभेनंतर राजकीय भूकंप होणार?
Complaint Against Jayant Patil: मोठी बातमी! जयंत पाटील यांच्याविरोधात काँग्रेसची निवडणूक आयोगात तक्रार; काय आहे प्रकरण? वाचा...

कोल्हापूर काँग्रेसमध्ये नाराजी

2019 मध्ये काँग्रेसचे चंद्रकांत जाधव विधानसभेत निवडून आले आणि आमदार झाले. 2021 मध्ये चंद्रकांत जाधवांचं निधन झालं. यानंतर पोटनिवडणुकीत जयश्री जाधवांना उमेदवारी देण्यात आली आणि त्या विजयी झाल्या. यंदा पक्षाकडून मधुरीमाराजेंना उमेदवारी देण्यात आली. यामुळे आमदार जयश्री जाधव नाराज झाल्या असून त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. तर यामुळे कोल्हापुरात शिवसेनेची ताकद वाढणार असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. तर असे अनेक धक्के काँग्रेसनं पचवले असून जनता काँग्रेस सोबत असल्याचा दावा सतेज पाटलांनी केला.

दरम्यान, लोकसभा निवडणुकांआधी राज्यातील काँग्रेसचे बडे नेते भाजपवासी झाले. आगामी काळात आणखी किती काँग्रेसी भाजप आपल्या गोटात सामील करुन घेणार आणि त्यातून शत प्रतिशत भाजपचं ध्येय कसं साध्य होणार हेच पाहायचं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com