Complaint Against Jayant Patil: मोठी बातमी! जयंत पाटील यांच्याविरोधात काँग्रेसची निवडणूक आयोगात तक्रार; काय आहे प्रकरण? वाचा...

Maharashtra Assembly Election 2024: काँग्रेने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याविरोधात निवडणूक आयोगात तक्रार दाखल केली. नेमकं काय आहे प्रकरण, जाणून घ्या...
मोठी बातमी! जयंत पाटील यांच्याविरोधात काँग्रेसची निवडणूक आयोगात तक्रार; काय आहे प्रकरण? वाचा...
Complaint Against Jayant PatilSaam Tv
Published On

विजय पाटील, साम टिव्ही, प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याविरोधात सांगलीमध्ये काँग्रेसकडून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आचारसंहिता भंग केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहेत.

एक मोठी राजकीय बातमी समोर आली. सांगलीत महाविकास आघाडीत बिघाडी दिसून येत आहे. याचे कारण म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याविरोध मविआमधील मित्र पक्ष असलेल्या काँग्रेसने निवडणूक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार दसखल केलीय. आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी ही तक्रार देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

मोठी बातमी! जयंत पाटील यांच्याविरोधात काँग्रेसची निवडणूक आयोगात तक्रार; काय आहे प्रकरण? वाचा...
Maharashtra Politics: कोणाला पडायचं, कुठे लढायचं, या दिवशी घेणार निर्णय; मनोज जरांगेंनी आपली रोखठोक भूमिका केली जाहीर; VIDEO

इस्लामपूरमध्ये शरद पवार गटाच्या कार्यालयाच्या मालकी हक्कावरून काँग्रेसकडून ही तक्रार दाखल केली आहे, असं सांगण्यात येत आहे. इस्लामपूरमध्ये शरद पवार गट आणि काँग्रेसमधील कार्यालयाचा वाद आता पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

आता याचप्रकारणी जयंत पाटील यांच्याविरोधात कारवाई कारण्यात यावी, म्हणून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे.

मोठी बातमी! जयंत पाटील यांच्याविरोधात काँग्रेसची निवडणूक आयोगात तक्रार; काय आहे प्रकरण? वाचा...
PM Modi Diwali Celebrations: पंतप्रधान मोदींनी कच्छमध्ये जवानांसोबत साजरी केली दिवाळी, सैनिकांना स्वत:च्या हाताने भरवली मिठाई

ठाकरे गटाची मनसेविरोधात तक्रार

दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाने मनसे विरोधात राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलीगम यांच्याकडे तक्रारीचे निवेदन दिलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर येथे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पक्षाच्या बॅनरखाली दीपोत्सव साजरा करायला बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे देण्यात आलेल्या नियमबाह्य परवानगी बाबत, तसेच ह्या कार्यक्रमस्थळी मनसेचे स्थानिक माहीम विधानसभेचे उमेदवार अमित राज ठाकरे हे उपस्थित राहिल्याने सदर कार्यक्रमाचा संपूर्ण खर्च त्यांच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करण्यात यावा, या मागण्यांसाठी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगमजी यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अनिल देसाई यांनी भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com