Pune News: २१ मतदारसंघ आणि १५ दिवस, भरारी पथकाची बेधडक कारवाई; दारूसाठा, चांदीसह १४ कोटी ५७ लाखांचं घबाड जप्त

Maharashtra Assembly Election 2024: राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यापासून भरारी पथका ॲक्शन मोडवर आल्याचं दिसत आहे.
पुणे पोलीस अॅक्शन मोडवर, ड्रग्सचे सेवन करणारे ते '११९' जणं पोलिसांच्या रडारवर
Pune PoliceSaam Tv
Published On

सचिन जाधव, साम टीव्ही, प्रतिनिधी

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यापासून पोलीस यंत्रणा ॲक्शन मोडवर असल्याचं दिसत आहे. यातच आचारसंहिता जाहीर झाली तेव्हापासून ते आतापर्यंत पुणे शहर जिल्ह्यातील विविध भागात भरारी पथकांनी अनेक कारवाई केल्या. या कारवाईत रोख रक्कम आणि मुद्देमाल हस्तगत केला आहे.

भरारी पथकांना खेडशिवापूर येथे सापडलेल्या पाच कोटी रुपयांच्या रकमेसह खेड, आळंदी, मावळ, हडपसर, शिरूर, दौंड आणि वडगाव शेरी या ठिकाणी नऊ कोटींहून अधिक रुपयांची रोख रक्कम सापडली.

पुणे पोलीस अॅक्शन मोडवर, ड्रग्सचे सेवन करणारे ते '११९' जणं पोलिसांच्या रडारवर
Maharashtra Politics : लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा, बारामतीत अजित पवार काय म्हणाले?

त्याशिवाय दोन लाख ४३ हजार लीटर एक कोटी ८२ लाख रुपये किमतीचे मद्य जप्त करण्यात आले. जिल्ह्यातील २१ मतदारसंघांमधून एक कोटी ८२ लाख रुपये किमतीचे मद्य जप्त करण्यात आले.

तर भोसरी, चिंचवड, दौंड, जुन्नर, कसबा पेठ, खेड-आळंदी, कोथरूड, मावळ, पुरंदर, शिवाजीनगर, शिरूर आणि वडगाव शेरी या मतदारसंघांतून सुमारे २३ लाख रुपये किमतीचे अमली पदार्थ आढळले आहेत.

पुणे पोलीस अॅक्शन मोडवर, ड्रग्सचे सेवन करणारे ते '११९' जणं पोलिसांच्या रडारवर
Kolhapur Politics:...म्हणून कोल्हापुरात काँग्रेसने उमेदवार बदलला; राजेश क्षीरसागरांचा खणखणीत टोला

कोथरूडमध्ये सुमारे ३७ किलो वजनाचे आणि १८ लाख १२ हजार रुपये किमतीची चांदी जप्त केली आहे.तसेच पर्वती मतदारसंघात ४३ हजार ७९२ ग्रॅम वजनाचे आणि सुमारे १३८ कोटी रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने पोलिसांकडून जप्त करण्यात आले. मात्र, त्याची शहानिशा करून ते दागिने संबंधित सराफांना देण्यात आले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com