Kolhapur Politics:...म्हणून कोल्हापुरात काँग्रेसने उमेदवार बदलला; राजेश क्षीरसागरांचा खणखणीत टोला

kolhapur Political News : राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. विकास कामाच्या मुद्द्यावरून क्षीरसागर यांनी काँग्रेसवर तोफ डागली आहे.
...म्हणून कोल्हापुरात काँग्रेसने उमेदवार बदलला; राजेश क्षीरसागरांचा खणखणीत टोला
Kolhapur Politicssaam tv
Published On

रणजीत माजगावकर, साम टीव्ही प्रतिनिधी

कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उंची फार मोठी आहे. त्यांच्यावर आरोप आणि टीका करण्याचे धाडस सतेज पाटील यांनी करू नये. महायुती ही विकास कामाच्या मुद्द्यावरच निवडणुकीला सामोरे जात असल्याने त्यांच्या पोटात दुखत आहे. काँग्रेसच्याच पायाखालची वाळू घसरल्याने त्यांना उमेदवार बदलण्याची वेळ आली, असा टोला राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी लगावला. ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.

आमदार जयश्री जाधव यांना काँग्रेस नेत्यांकडून अपमानास्पद वागणूक दिली. त्यांच्यावर अन्याय केला. म्हणून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या उपनेत्या म्हणून पद दिले. महिला सबलीकरासाठी त्या काम करणार आहेत. पुढच्या काळात योग्य तो न्याय देणार असल्याचा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. पण त्यांना शिवसेनेमध्ये आणण्यात माझा काही संबंध नाही, असे क्षीरसागर म्हणाले.

...म्हणून कोल्हापुरात काँग्रेसने उमेदवार बदलला; राजेश क्षीरसागरांचा खणखणीत टोला
Maharashtra Politics : लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा, बारामतीत अजित पवार काय म्हणाले?

'महिनाभरापूर्वी त्यांना सांगण्यात आले की उमेदवारी त्यांना मिळणार नाही. त्यांनी ते स्वीकारले, त्यांनी सामान्य कार्यकर्ते राजेश लाटकर यांचं नाव सुचवले. पण ऐनवेळी त्यांनी उमेदवार बदलला. बदलेल्या निर्णयात त्यांना विचारत घेतले नसल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले. मात्र काँग्रेस नेत्यांनी सातत्याने महायुतीवर आरोप केलेत, त्यांचे आरोप बिनबुडाचे आहेत. काँग्रेसच्या पायाखालची वाळू घसरल्याने त्यांनी उमेदवार बदलला. माघारीपर्यंत उमेदवारी राहील की नाही शंका आहे, असा टोलाही क्षीरसागर यांनी लगावला.

'पुढच्या काळात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातील अनेक प्रवेश होणार आहेत.सतेज पाटील यांची कीव येते, दोन वेळा मंत्री झाले. शाहू फुले यांचे नाव घेऊन राजकारण केले, मंत्री झाले पण कोल्हापूरचा विकास केला नाही. लोकांमध्ये सभ्रम पसरवला जातो. IRB आणि 208 कोटीचा प्रकल्प आणला त्यात भ्रष्टाचार केला. दोन दोन वेळा मंत्रीपद भोगले, पालकमंत्री झाले पण कोल्हापूरचा विकास केला नाही, असा आरोप करत क्षीरसागर यांनी महायुतीने केलेल्या विकास कामावर लक्ष केंद्रित केले आहे.

...म्हणून कोल्हापुरात काँग्रेसने उमेदवार बदलला; राजेश क्षीरसागरांचा खणखणीत टोला
Shahada Vidhan sabha : काँग्रेसची डोकेदुखी वाढली! शहादा तळोदा मतदारसंघात बंडखोरीमुळं तिरंगी लढत

'महायुतीने केलेले विकासकाम मोठे आहे. त्यांना पराभव दिसत आहे. म्हणूनच त्यांच्या पोटात दुःखात आहे, स्वतःच्या संस्था कशा मोठ्या होतील हेच पाहिले आहे, असा हल्लाबोल राजेश क्षीरसागर यांनी काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्यावर केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com