Congress News : मविआमध्ये कॉंग्रेसची नमती भूमिका, काही जागांवर घेणार माघार ?
मविआमध्ये कॉंग्रेस काही जागांवर माघार घेण्याच्या तयारीत असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. यात नाशिक, भायखळा आणि अन्य काही जागांवर कॉंग्रेस पक्ष माघार घेणार आहे, असं सूत्रांनी सांगितलं आहे. आज होणाऱ्या बैठकीत यासंदर्भात चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. ४ नोव्हेंबरला कॉंग्रेसकडून या जागांवरील अर्ज माघारी देखील घेण्यात येणार आहेत. त्यामुळे कॉंग्रेसने मविआमध्ये काहीशी नमती भूमिका घेतलेली दिसत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा सुटत नव्हता. त्यातच आता ज्या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार आणि ठाकरे गटाने देखील उमेदवार दिले आहेत, अशा ठिकाणी कॉंग्रेसने आता माघार घेण्याचं ठरवलं आहे. यात नाशिक आणि भायखळासह अजून काही जागांचा समावेश असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. अर्ज मागे घेण्याच्या दिवशी म्हणजेच ४ नोव्हेंबरला कॉंग्रेस या जागांवरून आपले अर्ज देखील मागे घेणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. मविआमधील ज्या १० ते १२ जागांवर पेच आहे त्याठिकाणी बंडखोरी होणार नाही यासाठी कॉंग्रेसकडून प्रयत्न करण्यात येणार आहेत. याबाबत आजच्या बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात येणार असून या जागा कोणत्या यावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे.
Edited By Rakhi Rajput
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.