मुंबईत राज ठाकरेंनी माहीम या मतदारसंघातून अमित ठाकरेंना उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने सदा सरवणकर यांना तिकिट दिलं आहे. युती धर्म पाळू असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. अमित ठाकरे या मतदारसंघातून उभे आहेत. त्यामुळे सदा सरवणकर यांनी या मतदारसंघातून माघार घ्यावी, अशी भाजपाची इच्छा आहे. मात्र निवडणूक लढवण्यावर सदा सरवणकर ठाम आहेत.
यंदा माहीम मतदारसंघात तिरंगी लढत होताना दिसणार आहे. शिवसेना एकनाथ शिंदे गटाने सदा सरवणकर यांना उमेदवारी दिली आहे. तर मनसेकडून राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरे रिंगणात आहेत. यासोबत ठाकरे गटाकडून महेश सावंत यांना तिकीट दिलं आहे.
सदा सरवणकरांनी केवळ निवडणूक लढण्यावरच ठाम असल्याच म्हटलं नाही तर त्यांनी विरोधी उमेदवार मनसेच्या अमित ठाकरेंवर निशाणा साधलाय. ज्यांचा एकही आमदार नाही, त्यांनी मुख्यमंत्री कोण हे सांगणं हास्यास्पद आहे, अशा शब्दांत सदा सरवणकरांनी राज ठाकरे आणि अमित ठाकरेंना डिवचलंय.
विधानसभा निवडणुकीत महायुतीत माहिमच्या जागेवरुन तिढा निर्माण झालायं. यात भाजपने उघडपणे अमित ठाकरेंना पाठींबा देण्याची भूमिका मांडलीये.त्यामुळे सदा सरवरणकर महायुतीचे उमेदवार असून एकाकी पडणार की भाजप युती धर्म पाळून सरवणकरांच्या पाठीशी राहणार हेच पाहायचं.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.