FIR Against Arvind Sawant: 'माल' विधान भोवलं, शायना एनसी यांच्या तक्रारीवरून अरविंद सावंत यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Shaina NC On Arvind Sawant: अरविंद संवत यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात शायना एनसी यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर झाले असून सगळेच राजकीय जोरदार प्रचारात गुंतले आहे. यातच ठाकरे गटाचे नेते आणि खासदार अरविंद सावंत यांनी प्रचारादरम्यान शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार शायना एनसी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. अमीन पटेल यांचा प्रचार करताना सावंत यांनी म्हटलं की, ''आम्हाला इम्पोर्टेड माल नको... आमचा ओरिजनल माल आहे.'' आता हेच वक्तव्य भोवलं आहे. अरविंद सावंत यांचं वक्तव्याविरोधात शायना एनसी यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तसेच त्या म्हणल्या आहेत की, ''मविआ महिलांचा सन्मान करत नाही. अपशब्द वापरल्यावर महिला शांत बसणार नाही.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com