Raj Thackeray: म्हणून मला मंत्रिपद मिळालं, राज ठाकरेंच्या 'त्या' टीकेवर रामदास आठवले यांनी दिलं प्रत्युतर

Ramdas Athawale On Raj Thackeray: राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला रामदास आठवले यांनी आता उत्तर दिलं आहे. ते काय म्हणाले जाणून घ्या...
म्हणून मला मंत्रिपद मिळालं, राज ठाकरेंच्या 'त्या' टीकेवर रामदास आठवले यांनी दिलं प्रत्युतर
Raj Thackeray-Ramdas Athwale NewsSaam TV
Published On

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यावर टीका करत म्हटलं होतं की, ''आठवलेंसारखं मंत्री व्हायचं झाल्यास मी माझा पक्ष बंद करेन.'' यावरच आता रामदास आठवले यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले आहेत की, ''राज ठाकरे एका पक्षाचे नेते आहेत. मी त्यांच्या विरोधात कधी बोलत नाही. माझ्यासारखा माणूस त्यांच्या पक्षात जाणार नाही.''

ते म्हणाले, ''मी पँथर काळापासून संघर्ष केला आहे. त्यामुळं मला मंत्रिपद मिळालं आहे. राज ठाकरे यांना बोलूद्या.. माझा पक्ष गरिबांचा पक्ष आहे. आता मी मंत्री झालोय तर राज ठाकरे यांनी त्यांचा पक्ष बंद करावा.'' माध्यमांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत.

म्हणून मला मंत्रिपद मिळालं, राज ठाकरेंच्या 'त्या' टीकेवर रामदास आठवले यांनी दिलं प्रत्युतर
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांची सुरक्षा वाढवली; घरासमोर फोर्स-वन कमांडो तैनात, एसआयडीचा गोपनीय रिपोर्टमध्ये नेमकं काय?

'महायुतीला विधानसभेला 170 पर्यंत जागा मिळतील'

राज्यातील विधानसभा निवडणुकीबद्दल बोलताना रामदास आठवले म्हणाले की, ''महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यात. महायुती आणि महाविकास आघाडी, असा संघर्ष असला तरी ही निवडणूक महायुतीसाठी अत्यंत सोप्पी आहे.''

ते म्हणाले ,''लोकसभेला महाराष्ट्रात नॅरेटिव्हमुळे आमचं मोठं नुकसान झालं. तरी लोकसभेला आम्हाला झालेलं मतदान हे मोठं आहे. महायुतीला विधानसभेला 170 पर्यंत जागा मिळतील.''

म्हणून मला मंत्रिपद मिळालं, राज ठाकरेंच्या 'त्या' टीकेवर रामदास आठवले यांनी दिलं प्रत्युतर
Maharashtra Politics : बारामतीत पवार कुटुंबीयांचे यंदा दोन पाडवे का? अजितदादांनी सांगितलं कारण,VIDEO

आठवले म्हणाले, ''आरपीआयला एकच जागा मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांमधे नाराजी होती. मात्र मी ती दूर केली आहे. विधानसभेला जरी एक जागा असेल तरी आम्हाला एक विधानपरिषद आणि सत्ता आल्यावर मंत्रिपद देण्याचं आश्वासन फडणवीस आणि शिंदे यांनी दिलं आहे. महायुतीचे 17 उमेदवार लोकसभेला जिंकले. त्यात आमच्या पक्षाची मते आहेत.''

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com