पुणे : पुणे जिल्ह्यातील केसनंद ग्रामपंचायतीच्या शेजारी असणाऱ्या कापड दुकानामध्ये मध्यरात्री सुमारास चोरीची घटना घडली आहे. यात चोरट्यानी तब्बल तीन लाख ८० हजारांची रोकड लांबविली आहे. याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सागरमल माली यांचे पुणे (Pune) जिल्ह्यातील केसनंद गावात बालाजी टेक्सटाईल्स नावाने दुकान आहे. रात्री माली हे दुकान बंद करून घरी गेले होते. दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून दुकानातील गल्ल्यामध्ये असलेली तीन लाख ८० हजारांची रोकड लांबवली. सदरचा प्रकार सकाळी उघडकीला आला. यानंतर माली यांनी पोलिसांना (Police) सदर घटनेची माहिती दिली.
दरम्यान तीन जणांनी मिळून कापड दुकानात चोरी केल्याचे दुकानात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात दिसून येत आहे. चोरट्यांच्या हालचाली कॅमेरात कैद झाल्या आहेत. या प्रकरणी बालाजी टेक्सटाईल्सचे मालक सागरराम माली यांनी फिर्याद दिली असून अधिक तपास वाघोली पोलीस करीत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.