Ambarnath Shiv Mandir: प्राचीन अंबरनाथ शिवमंदिर परिसराचा होणार कायापालट, १५० कोटींचा निधी मंजूर

Ambarnath Shiv Mandir: अंबरनाथमध्ये एक हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन संस्कृतीचा पुरावा असलेल्या शिवमंदिर परिसराचा कायापालट होणार असून सुशोभिकरणाच्या कामासाठी १५० कोटी मंजूर करण्यात आले आहेत.
Ambernath Shiv Temple News
Ambernath Shiv Temple NewsSaam Digital
Published On

Ambarnath Shiv Mandir

अभिजीत देशमुख

अंबरनाथमध्ये एक हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन संस्कृतीचा पुरावा असलेल्या शिवमंदिर परिसराचा कायापालट होणार आहे. काशी विश्वनाथ मंदिर परिसराच्या धर्तीवर शिवमंदिर परिसर सुशोभिकरणाच्या कामासाठी १५० कोटींच्या कामाचे कार्यादेश देण्यात आले असून येत्या दोन वर्षात मंदिराचे काम पूर्णत्वाला जाणार असल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. कल्याणमधील चक्की नाका परिसरात एका रुग्णालयाच्या उद्घाटनावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी ही माहिती दिली

अंबरनाथ शहरात एक हजार वर्षापूर्वीचे शिलाहारकालीन प्राचीन शिवमंदिर आहे. कल्याणचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून या मंदिराला जागतिक पातळीवर स्थान मिळवून देण्यासाठी काही वर्षांपूर्वी जागतिक दर्जाच्या कला महोत्सवाची सुरुवात करण्यात आली होती. या शिवमंदिर परिसराच्या सुशोभिकरणाच्या कामासाठी १५० कोटी किंमतीच्या प्रस्तावाला राज्य शासनाने मंजुरी दिली. त्यामुळे येणाऱ्या दोन वर्षात या मंदिराचा कायापालट होणार आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Ambernath Shiv Temple News
Rohit Pawar News: फडणवीस ओबीसी मराठा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत; रोहित पवारांचा गंभीर आरोप

प्राचीन शिवमंदिर ही मध्यवर्ती संकल्पना निश्चित करून परिसरामध्ये या प्राचीन शिल्पाच्या धर्तीवर कामे केली जाणार आहेत. सुशोभिकरणाचे संपूर्ण काम काळ्या पाषाणात केले जाणार यात प्रवेशद्वार, प्रवेशद्वारासमोरील चौकात नंदी, वाहनतळ, प्रदर्शन केंद्र,अँम्पी थिएटर, संरक्षक भिंत, मुख्य रस्ता व अंतर्गत रस्ते, क्रिडांगण आणि स्वच्छतागृह, बंधारा, भक्त निवास, घाट आणि संरक्षक भिंत या कामांचा समावेश आहे. त्यामुळे लवकरच या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असून 2 वर्षात या प्राचीन शिवमंदिरातील कायापालट होणार असल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे.

Ambernath Shiv Temple News
Maharashtra News: जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा एसटी महामंडळाला फटका , सदावर्तेंची दोन हजार कोटींची मागणी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com