Shimla Shiv Mandir Landslide: शिमल्यातील शिवमंदिरावर कोसळली दरड, आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

Himachal Pradesh News: या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला. २ दिवसांपासून घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. मृ
Shimla Shiv Mandir Landslide
Shimla Shiv Mandir LandslideSaam Tv

Himachal Pradesh News: हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) शिमलामध्ये (Shimala) सोमवारी मोठी दुर्घटना घडली होती. समरहिल येथील शिव मंदिरावर (Shiv Mandir) मोठी दरड कोसळली. या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला. २ दिवसांपासून घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Shimla Shiv Mandir Landslide
Railway Booking Clerk Lost Job : रग्गड पगाराची नोकरी अवघ्या ६ रुपयांसाठी गमावली; रेल्वेच्या बुकिंग क्लार्कवर आली पश्चातापाची वेळ

मिळालेल्या माहितीनुसार, शिमल्याच्या समरहिल परिसरात १४ ऑगस्टला भूस्खलनाची घटना घडली. या भूस्खलनामध्ये मातीचा ढिगारा याठिकाणी असलेल्या प्रसिद्ध शिव मंदिरावर (Shimla Shiv Mandir Landslide) पडला. त्यानंतर घटनास्थळावर एनडीआरएफ, एसडीआरएफ, भारतीय लष्कराचे जवान, स्थानिक पोलीस आणि होमगार्ड यांच्यामाध्यमातून बचावकार्य करण्यात आले. शिमल्याचे एसडीएम भानु गुप्ता यांनी सांगितले की, ढिगाऱ्याखालून आतापर्यंत १४ जणांचा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

ढिगाऱ्याखाली २१ जणांचे मृतदेह असू शकतात. त्यापैकी गेल्या दोन दिवसांत १४ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. एसडीएम भानु गुप्ता यांनी सांगितले की, शोध मोहीम सुरू आहे. ११ जणांच्या मृतदेहांची ओळख पटली आहे. तर इतर मृतदेहाची ओळख पटलेली नाही. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील ७ जण बेपत्ता झाले आहेत. ते सापडत नसल्यामुळे नातेवाईक चिंतेत आहेत. हे सर्वजण शिव मंदिरामध्ये उपस्थित होते. मंदिरात पूजा सुरु असताना दरड कोसळली. त्यामुळे मोठ्या संख्येने भाविक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे.

Shimla Shiv Mandir Landslide
Latur News: पतीचं निधन झालं, विरहानं पत्नीनंही मृत्यूला कवटाळलं; हृदय हेलावणारी घटना

श्रावण सोमवार असल्याने समरहिलच्या शिवमंदिरात सकाळपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मुसळधार पावसामुळे भूस्खलनाची घटना घडली आणि सकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास मंदिरावर झाडांसह मोठा ढिगारा कोसळला. यामुळे हे मंदिर पूर्णपणे ढिगाऱ्याखाली गाडले गेले. मंदिरात उपस्थित असलेल्या भाविकांना बाहेर पडण्याचीही संधी मिळाली नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com