Latur News: पतीचं निधन झालं, विरहानं पत्नीनंही मृत्यूला कवटाळलं; हृदय हेलावणारी घटना

Latur Shivaji Nagar Police Station: पतीच्या निधनानंतर वैफलग्रस्तातून या महिलेने टोकाचे पाऊल उचलंत आपले जीवन संपवले
Latur Crime News
Latur Crime NewsSaam Tv

संदिप भोसले, लातूर

Latur News: लातूरमध्ये (Latur) एका महिला रुग्णाने हॉस्पिटलमध्येच गळफास लावून आत्महत्या (women end life in hospital bathroom) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लातूरच्या सिटी हॉस्पिटलमध्ये (Latur City Hospital) ही घटना घडली आहे. पतीच्या निधनानंतर वैफलग्रस्तातून या महिलेने टोकाचे पाऊल उचलंत आपले जीवन संपवले. या घटनेमुळे लातूरमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास शिवाजीनगर पोलीस (Shivajinagar Police) करत आहेत.

Latur Crime News
Mumbai News : फक्त ६ रुपयांसाठी रेल्वेच्या बुकिंग क्लार्कची गेली नोकरी; काय आहे संपूर्ण प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, शितल तात्याराव ढवळे (३८ वर्षे) असं आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. शितल या धाराशिव जिल्ह्यातल्या हांद्रळ या गावात राहत होत्या. त्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका होत्या. २ महिन्यांपूर्वीच त्यांच्या पतीचे अपघाती निधन झाले होते. पतीच्या अकाली जाण्याने शितल ढवळे या एकट्या पडल्या होत्या. पतीच्या विरहानं त्या डिप्रेशनमध्ये होत्या.

Latur Crime News
Pune Crime News: पुण्यात 'मुळशी पॅटर्न'ची पुनरावृत्ती, १० ते १२ जणांच्या टोळीकडून तरुणाची निर्घृण हत्या; कुटुंबीयांचा आक्रमक पवित्रा

शितल डिप्रेशनमध्ये असल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी उपचारासाठी लातूर येथे आणले होते. मंगळवार म्हणजे कालच त्यांना लातूरच्या सिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. पण त्यांनी पतीच्या आठवणीत टोकाचे पाऊल उचलले. त्यांनी हॉस्पिटलच्या बाथरुममध्ये गळफास लावून आत्महत्या केली.

Latur Crime News
Sharad Pawar Supporter: साहेब नाही तर लग्न नाही! शरद पवारांच्या निष्ठावंत कार्यकर्त्याने २ वेळा मोडले लग्न, स्वत:च सांगितला भन्नाट किस्सा

शितल ढवळे यांच्या पाश्चात एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. आधी वडिलांचे आणि आईचे निधन झाल्यामुळे मुलं पोरकी झाली आहेत. शितल यांनी आत्महत्या केल्यामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणी लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com