Sharad Pawar Supporter: साहेब नाही तर लग्न नाही! शरद पवारांच्या निष्ठावंत कार्यकर्त्याने २ वेळा मोडले लग्न, स्वत:च सांगितला भन्नाट किस्सा

अनेक कार्यकर्ते हे निष्ठेने काम करीत राहतात. एखाद्या पक्षाच्या मागे खंबीरपणे उभे राहतात.अशाच एका निष्ठावान कार्यकर्त्याची कहाणी समोर आली आहे.
Sharad Pawar Supporter
Sharad Pawar SupporterSharad Pawar Supporter

Baramati News: सध्या पक्ष फोडाफोडीचे राजकारण आणि या पक्षातून त्या पक्षात जाणारे राजकीय मंडळी आपण बघत आलोय. मात्र तरीही अनेक कार्यकर्ते हे निष्ठेने काम करीत राहतात. एखाद्या पक्षाच्या मागे खंबीरपणे उभे राहतात. अशाच एका निष्ठावान कार्यकर्त्याची कहाणी समोर आली आहे. (Latest Marathi News)

सुभाष झगडे हे बारामती तालुक्यातील काटेवाडी गावातील त्यांची शरद पवार यांचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत. शरद पवार यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहणारी त्यांच्या कुटुंबाची चौथी पिढी आहे. त्यांच्या तीन पिढ्या या शरद पवार यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या राहिल्या आहेत.

Sharad Pawar Supporter
Raj Thackeray Speech: भरसभेत राज ठाकरेंनी केली अजित पवारांची नक्कल; खड्ड्यावरून भाजपवरही साधला निशाणा

वयाच्या 22 व्या वर्षी सुभाष झगडे हे छत्रपती सहकारी साखर कारखान्यावर संचालक म्हणून निवडून गेले. या झगडे यांनी असा पण केला होता की, शरद पवार माझ्या लग्नाला आले तरच मी लग्न मांडवात उभा राहणार आहे. त्यानुसार त्यांना लग्नासाठी स्थळ ही येऊ लागली.

मात्र, शरद पवार यांची लग्नासाठी वेळ न मिळाल्याने त्यांनी ती एक दोन लग्नही रद्द केली. पवार साहेब लग्नाला आले तरच मी लग्नाला उभा राहीन या भूमिकेवर झगडे हे ठाम होते.

लग्नकार्य जमले की लग्नाचा मुहूर्त पंचांग पाहून काढला जातो, मात्र सुभाष झगडे यांच्या लग्नाचा मुहूर्त होता, तो म्हणजे शरद पवार यांनी दिलेली तारीख. ज्या तारखेला साहेबांना माझ्या लग्नाला वेळ असेल, त्या दिवशी माझे लग्न करायचे असा हट्ट झगडे यांचा होता. त्यानुसार शरद पवार यांनी दिलेल्या तारखेनुसारच झगडे यांचा लग्नाचा शुभ मुहूर्त देखील ठरला.

2000 साली छत्रपती सहकारी साखर कारखाना येथील मंगल कार्यालयात सुभाष झगडे यांचे लग्न होते. या दिवशी शरद पवार यांनी या लग्नाला येण्याची तारीख देखील दिली होती. मात्र तरी देखील साहेब आल्याशिवाय लग्नाच्या मंगलाष्टिका सुरू करायच्या नाहीत, नाहीतर मी लग्न मंडपातून धूम ठोकेल, असा इशारा देखील सुभाष झगडे यांनी घरच्या मंडळींना दिला होता. त्यामुळे घरची मंडळी काहीशी चिंतेतच होती.

Sharad Pawar Supporter
Raj Thackrey Speech : चांद्रयान 3 चंद्रावर पाठवलं, आपल्याला काय उपयोग?, खड्ड्यांवरून राज ठाकरेंनी काढली खरडपट्टी

शेवटी लग्नाची वेळ जवळ आली आणि काही क्षणात शरद पवार यांची गाडी मंगल कार्यालयामध्ये दाखल झाली. शरद पवार लग्नाला आले हे पाहताच झगडे यांनी लग्नाच्या मंगलाष्टिका सुरू करण्यासाठी परवानगी दिली. शरद पवार यांच्या उपस्थितीत सुभाष झगडे यांचा विवाह पार पडला, त्यानंतर शरद पवार यांनी वधू-वरांना आशीर्वाद दिले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com