
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रावादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची नुकतीच भेट झाली. यावरुन राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं होतं. याबाबत पत्रकारांनी अजित पवारांना प्रश्न विचारले असता, त्यांनी ही अराजकीय भेट होती, अशी उत्तरं दिली होती. त्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अजित पवारांची नक्कल केली आहे. (Latest Marathi News)
"मी दिसलो का तुला गाडीमध्ये, मी झोपलो होतो का? मी होतो का तिथं? निर्लज्जपणाचा कळस सुरू आहे महाराष्ट्रात. आपण या सरकारमध्ये का आलेला आहात? असं विचारल्यावर अजित पवार म्हणतात महाराष्ट्राचा विकास करायचाय मला. अरे किती खोटं बोलता.", अशा शब्दांत राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडलं. तसेच त्यांची नक्कल देखील केली.
पुण्यातील चांदणी चौकाच्या उद्घाटनानंतर एका बंगल्यावर शरद पवार आणि अजित पवार यांची भेट झाली होती. यावेळी बंगल्यातून बाहेर पडताना अजित पवार त्यांच्या कारमध्ये नव्हते. मागून येणाऱ्या एका काळ्या रंगाच्या कारमध्ये ते झोपलेले दिसल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं होतं. नंतर पत्रकारांनी अजित पवारांना यावरुन प्रश्न विचारल्यावर ही भेट अराजकीय होती, काकांना भेटू शकत नाही का? ही कौटुंबिक भेट होती, अशी उत्तरे दिली होती.
महाराष्ट्रात ७० हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे असे आरोप मोदींनी केले होते. मग हे सगळेजण टुणकन इथे (भाजपाबरोबर) आले. कारण, छगन भुजबळांनी अजित पवारांना सांगितलं असणार. आत काय काय असतं? जाऊ नको. आपण हवं तर इथे जाऊ पण तिथे नको, अशा शब्दांत राज ठाकरेंनी भुजबळांवर देखील निशाणा साधला आहे.
भाजपला टोला
एवढी सरकारं आल्यानंतरही खड्डे आहे तसेच आहेत. तुम्ही मतदान करता कसं या लोकांना. यांना धडा शिकवावा असं कधी तुम्हाला वाटत नाही का? असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
अमित जात असताना काही कारणास्तव मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोलनाका फोडला. तेव्हा भाजपने टीका केली. भाजपने लोकांचे आमदार न फोडता पक्ष बांधायला पण शिका, अशी टीका राज ठाकरेंनी भाजपवर केली.
बारसू प्रकल्पासाठी कोण काम करतंय? एखादा रस्ता २५ वर्षांसाठी चांगला केला तर पैसे खायचे कसे. नवीन रस्ता, नवीन टेंडर, नवीन टक्केवारी. जे खोके खोके ओरडताहेत त्यांच्याकडे कंटेनर्स आहेत. त्यांनी कोरोना काळ सुद्धा सोडला नाही. प्रत्येक वेळी बाळासाहेबांच्या नावावर मते मागितली जातात, असा निशाणा उद्धव ठाकरेंवर साधला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.