Raj Thackrey Speech : चांद्रयान 3 चंद्रावर पाठवलं, आपल्याला काय उपयोग?, खड्ड्यांवरून राज ठाकरेंनी काढली खरडपट्टी

Raj Thackrey on Mumbai Goa Highway's Potholes : एवढी सरकार आल्यानंतरही खड्डे आहे तशीच आहेत.
Raj Thackrey
Raj Thackrey Saam TV

रुपाली बडवे

Raj Thackrey Speech On Mumbai-Goa Highway News:

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील रस्त्यांच्या दुरवस्थ्यांचे मुद्द्यावरुन सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर असलेले खड्डे यावरून मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेच्या पनवेलमधील निर्धार मेळाव्या राज ठाकरे बोलत होते.

रस्त्यांवरील खड्ड्यांच्या मुद्द्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, मला कळत नाही ते चांद्रयान चंद्रावर का पाठवलं आहे. चांद्रयानाचा आपल्याला काय उपयोग आहे. तिथे जाऊन खड्डेच बघायचे आहेत तर ते यान महाराष्ट्रात सोडायचं ना.

राज्यातील लोकांचं मला कौतुक वाटतं. २००७-०८ साली मुंबई-गोवा महामार्गाचं काम सुरु झालं. आतापर्यंत येथे १५ हजार कोटींहून अधिक खर्च झाला आहे. पण रस्ता आहे तसाच आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.

भाजपला टोला

एवढी सरकार आल्यानंतरही खड्डे आहे तशीच आहेत. तुम्ही मतदान करता कसं या लोकांना. यांना धडा शिकवावा असं कधी तुम्हाला वाटत नाही का? असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

अमित जात असताना काही कारणास्तव मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोल नाका फोडला. तेव्हा भाजपाने टीका केली. भाजपाने लोकांचे आमदार न फोडता पक्ष बांधायला पण शिका, अशी टीका राज ठाकरेंनी भाजपवर केली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com