ajit pawar news  saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: अजितदादांचे नियम धाब्यावर; प्रसिद्ध मटका किंग आणि कुख्यात गुंडाला पक्षात प्रवेश, चक्क आमदारांकडून 'शाही' स्वागत

Ajit Pawar: राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षात नांदेडच्या मोठ्या गुंडाचा प्रवेश पार पडला आहे, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Omkar Sonawane

नांदेड: राष्ट्रवादी काँगेस पक्षात प्रवेश देताना चारित्र्य तपासा , गुंड आणि दोन नंबदचे धंदे करणाऱ्यांना पक्षात प्रवेश देऊ नका अशी तंबी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती . मात्र नांदेडमध्ये गुंड आणि दोन नंबरचे धंदे करणाऱ्यांना राष्ट्रवादी मध्ये जाहीर प्रवेश देण्यात आला आहे.

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर अजित पवार गटावर मोठ्या प्रमाणात टीका होत होती. संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुख्य आरोपी वाल्मीक कराड हा माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्यामुळे धनंजय मुंडे यांचा मंत्रीपदाचा राजीनामा देखील घेतला. यानंतर बीडच्या पालकमंत्रीपदाचा चार्ज हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला.

या प्रकरणानंतर राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षावर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली होते. अजित पवारांनी जाहीर सभेत पक्षाच्या कार्यकर्त्यांना सूचना दिल्या होत्या. येथून पुढे पक्षात प्रवेश देण्याआधी त्या लोकांची पार्श्वभूमी माहीत करून घ्या, गुन्हेगारांना प्रवेश देऊ नये अशी जाहीर तंबी दिली होती. असे अजित पवार यांनी सांगूनही नांदेडमध्ये गुंडांना राष्ट्रवादी पक्षात प्रवेश देऊन अजित पवारांच्या आदेशाला कार्यकर्त्यांनी केराची टोपली दाखवली आहे.

नांदेड शहरातील प्रसिध्द मटका किंग , गुंड अनवर अली खान याने काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी गुंड अनवर अली खान याला निवासस्थानी बोलावून प्रवेश दिला. अनवर अली खान हा प्रसिध्द मटका किंग खान आहे. शिवाय त्याच्यावर मारामारी , बळजबरी जमिनीवर कब्जा करने , बेकादेशीर शस्त्र बागळने , हवेत गोळीबार , बायो डीझेल विकल्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

विशेष म्हणजे हा गुंड अनवर अली खानवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल असून याला पोलिसांनी तडीपार केले आहे. जर राजकीय लोकच अशा गुंडांना प्रवेश देऊन त्यांना राजकीय पाठबळ देत असतील तर राज्यात कोणाचाही संतोष देशमुख होऊ शकतो यात तीळमात्र शंका नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Driving Licence: आता घरबसल्या करा मिळवा ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया

Heavy Rain : मुसळधार पाऊस; वारणा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग, कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ

Kumbh Rashi : कुंभ राशीचा आजचा रविवार जाणार कसा? वाचा स्पेशल राशीभविष्य

Rohini Khadse: कोण आहेत रोहिणी खडसे? जाणून घ्या त्यांच्याविषयी

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

SCROLL FOR NEXT