Ranitai Lanke vs Sujay Vikhe Patil Saamtv
महाराष्ट्र

Ahmednagar News: सुजय विखे पाटलांना राणीताई लंकेंचे आव्हान; नगर दक्षिण लोकसभेवरुन 'महायुतीत' वादाची ठिणगी पडणार?

Gangappa Pujari

सुशील थोरात, अहमदनगर|ता. १२ जानेवारी २०२४

Ahmednagar Political News:

लोकसभा निवडणुका (Loksabha Election 2024) जशजशा जवळ येतील तसे राजकीय वातावरणही तापल्याचे पाहायला मिळत आहे. आगामी लोकसभा निवडणूका डोळ्यांसमोर ठेऊन राजकीय घडामोडींना वेग आला असून मतदार संघांवर दावे- प्रतिदावे केले जात आहेत.

अहमदरनगरमध्ये एकीकडे भाजप खासदार सुजय विखे पाटील खासदारकीची तयारी करत असतानाच त्यांच्याविरुद्ध आता दादा गटाचे आमदार निलेश लंकेंच्या पत्नी राणीताई लंके यांनी आव्हान दिले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महायुतीत संघर्ष पाहायला मिळण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

नगरमध्ये विखे विरुद्ध लंके?

सध्या अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) हे साखर वाटपाचा कार्यक्रम करत आहेत .तर या कार्यक्रमावर टीका करत माजी जिल्हा परिषद सदस्या आणि पारनेर नगर मतदार संघाचे अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके (Ranitai Lanke) यांनी सुद्धा लोकसभेची तयारी करण्यासाठी दक्षिण मतदार संघात शिवस्वराज्य यात्रा काढली आहे.

ही 'शिवस्वराज्य यात्रा' सध्या अहमदनगर (Ahmednagar) दक्षिण जिल्ह्यात सर्वच ठिकाणी जात आहे. आज ही शिवस्वराज्य यात्रा नांदगाव येथे आली असताना राणीताई लंके यांनी पुन्हा एकदा भाजपचे खासदार सुजय विखे यांच्यावर टीका केली. 'कुणी साखर वाटली तरी आम्ही जनतेच्या मनापर्यंत पोहोचलो' असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

महायुतीत वादाची ठिणगी...

दरम्यान, सध्या राज्यात महायुतीचे सरकार असून भाजप अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे हे एकत्र निवडणूक लढवणार असल्याचे नुकतेच जाहीर केले आहे. तरीही महायुतीतील दोन सदस्यच एकमेकांविरुद्ध उभे ठाकण्याचे सूतोवाच करत असल्याने महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Latest Marathi News)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Subhadra Yojana: महिलांना मिळणार १०,००० रुपये; काय आहे सुभद्रा योजना?

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

iPhone 16 Sale Video : iPhone 16 च्या खरेदीसाठी अॅपल स्टोअर बाहेर झुंबड; बघा Video

Maharashtra Politics: काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या, कुणाला मोठा भाऊ खुमखुमी असेल तर... ठाकरे गटाचा इशारा

Mumbai Crime: मुंबईत १३ वर्षीय मुलावर शौचालयात लैंगिक अत्याचार; मुलुंड परिसरातील धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT