राष्ट्रवादी काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते सातारा लाेकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीनिवास पाटील (mp shriniwas patil) यांच्या पत्नी रजनीदेवी पाटील (Rajni Devi Patil) (वय ७६) यांचे आज (शुक्रवार) पुणे येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी सहा वाजता कराड येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा (सांरग), सुन (रचनादेवी), नातवंडे असा परिवार आहे अशी माहिती खासदार पाटील यांच्या कार्यालयातून देण्यात आली. (Maharashtra News)
रजनीदेवी या काही दिवसांपासून आजारी होत्या. सध्या त्यांच्यावर पुणे येथे उपचार सुरू होते. आज (शुक्रवारी) दुपारी त्यांची प्रकृती गंभीर बनली होती. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला असे निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.
कराडमध्ये आज अंत्यसंस्कार
रजनीदेवी पाटील यांचा २६ जुलै १९४८ रोजी जन्म झाला. त्यांचे मूळ गाव सातारा तालुक्यातील चिंचणेर वंदन येथील असून चार पिढ्यांची सैनिकी परंपरा असलेल्या बर्गे कुटूंबातील आहे. १६ मे १९६८ रोजी त्यांचा खासदार श्रीनिवास पाटील यांच्याशी विवाह झाला.
खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रशासकीय, राजकीय व सामाजिक जीवनात त्यांनी कायम सोबत दिली. त्यांच्या पार्थिवावर आज (शुक्रवार) सायंकाळी सहा वाजता कराड येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत अशी माहिती खासदार पाटील यांच्या कार्यालयातून देण्यात आली.
प्रोत्साहन देणाऱ्या 'माई'
खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रत्येक कार्यामध्ये अतिशय हिरीरीने भाग घेऊन त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या रजनीदेवी यांना सर्वजण 'माई' या नावाने ओळखत असत. आदर्श संस्कारित आणि एक धार्मिक गृहिणी म्हणून त्यांची ओळख होती. उच्चशिक्षित असून देखील जुन्या रूढी परंपरा, संस्कृती जपण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
अत्यंत प्रेमळ स्वभाव आणि घरामध्ये येणाऱ्या प्रत्येकाशी त्या अत्यंत आपुलकीने वागत असत. गेले काही दिवस त्यांची प्रकृती अस्वस्थ होती. आज दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा (sarang shriniwas patil), सुन (rachnadevi sarang patil), नातवंडे असा परिवार आहे
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.