Amravati News: 'तलाठी भरती रद्द करा..' विद्यार्थ्यांचा अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा; आमदार यशोमती ठाकूर सहभागी

Amravati News: अमरावतीमध्ये (Amravati) स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी डॉ.अजय यावले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. तलाठी पदभरती रद्द करून नव्याने घ्या व पोलीस भरती तात्काळ काढा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली.
Amravati News:
Amravati News:Saamtv
Published On

अमर घटारे, अमरावती|ता. १२ जानेवारी २०२४

Amravati News:

गेल्या काही दिवसांपासून राज्यात तलाठी भरतीच्या निकालावरुन नवा वाद उभा राहिला आहे. राज्य सरकारकडून घेण्यात आलेल्या तलाठी भरती प्रक्रियेत मोठा गैरप्रकार झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. ही भरती प्रक्रिया रद्द करुन नव्याने पदभरती करण्यात यावी अशी मागणी विरोधकांकडून होताना दिसत आहे. याच मागणीसाठी अमरावतीमध्ये विद्यार्थी आक्रमक झाले असून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे.

तलाठी पदभरती पुन्हा घ्यावी तसेच टीसीएस आयबीपीएस या परीक्षा घेणाऱ्या कंपन्या बंद कराव्या या मागणीसाठी आज युवक दिनी विद्यार्थीवर्ग रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. अमरावतीमध्ये (Amravati) स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी डॉ.अजय यावले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

यावेळी तलाठी पदभरती रद्द करून नव्याने घ्या व पोलीस भरती तात्काळ काढा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. यावेळी मागण्याचे फलक विद्यार्थ्यांनी आक्रोश केला. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला कॉंग्रेस (Congress) आमदार यशोमती ठाकूर यांनी पाठिंबा दर्शवत मोर्चामध्ये सहभाग घेतला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Amravati News:
Rajmata Jijau Jayanti 2024 : छत्रपती संभाजीनगरमध्ये 50 हजार पणत्यांनी साकारली राजमाता जिजाऊंची प्रतिमा,जन्मस्थळीही भक्तांची अलाेट गर्दी

यशोमती ठाकूर यांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा...

दरम्यान, यावेळी बोलताना आमदार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. राष्ट्रीय युवक दिनी विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरावे लागत आहे. याबद्दल काय बोलणार? पंतप्रधान मोदींना (PM Narendra Modi) ते म्हणतील तेच खरे वाटते, त्यांना संविधानही खोटे वाटते.. असा टोला यशोमती ठाकूर यांनी लगावला. (Latest Marathi News)

Amravati News:
Maharashtra Politics: शिंदे गटाचे खासदार 'कमळ' चिन्हावर निवडणूक लढणार? ठाकरे गटाच्या नेत्याचा मोठा दावा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com