Ahmednagar News Saam tv
महाराष्ट्र

Ahmednagar News : स्मशानभूमीला जाण्यास रस्ता नाही तर आता मतदान नाही; वाघवाडी ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

Ahmednagar News : छोटं गाव असल्यामुळे जेऊर बायजाबाई ही ग्रामपंचायत वाघवाडी गावापासून तीन किलोमीटर अंतरावर आहे. या छोट्याशा गावामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून स्मशानभूमीचा प्रश्न प्रलंबित होता.

Rajesh Sonwane

सुशील थोरात 

अहमदनगर : गावाजवळ असलेल्या स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रोड नसल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. अनेक वर्षांपासून मागणी करून देखील रस्ता होत नसल्याने लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) तोंडावर मतदानावर बहिष्कार टाकून प्रलंबित काम पूर्ण करण्यासाठी नागरिक समोर येताना पाहायला मिळत आहेत (Ahmednagar) अहमदनगर शहराशेजारी असलेल्या वाघवाडी येथील ग्रामस्थांनी स्मशानभूमीचा रस्ता मिळावा; यासाठी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. (Latest Marathi News)

अहमदनगरपासून साधारण २० किलोमीटरवर असलेले वाघवाडी या गावातील लोकसंख्या साधारण ११५० इतकी आहे. गावामध्ये ६०० मतदार आहेत. छोटं गाव असल्यामुळे जेऊर बायजाबाई ही ग्रामपंचायत (Grampanchayat) वाघवाडी गावापासून तीन किलोमीटर अंतरावर आहे. या छोट्याशा गावामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून स्मशानभूमीचा प्रश्न प्रलंबित होता. काही दिवसांपूर्वी वन विभागाची दहा गुंठे जागा स्मशानभूमीसाठी ग्रामस्थांना मिळाली आहे. मात्र स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने स्मशानभूमी मिळवूनही ग्रामस्थांना अंत्यविधीसाठी जेऊर गावातील स्मशानभूमीकडे तीन किलोमीटर लांब जावं लागते.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मागणीसाठी ग्रामस्थांची टोकाची भूमिका 
अनेक वेळेस प्रशासनाकडे स्मशानभूमीच्या रस्त्यासाठी पाठपुरावा करूनही उपयोग होत नाही. निवडणुकीच्या (Election) तोंडावर प्रचारासाठी आलेले नेते स्मशानभूमीच्या रस्त्याचे आश्वासन देतात. मात्र निवडणुका संपल्या की पुन्हा जैसे थे परिस्थिती राहते. त्यामुळे आता जोपर्यंत रस्ता मिळत नाही; तोपर्यंत मतदार करणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. निवडणूक आता चांगले रंगात आली असून निवडणुकीत उभे राहिलेल्या उमेदवारांना आता अशा अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागणार आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Night Shower Benefits: शांत झोप आणि दीर्घायुष्याचं सिक्रेट! रात्री आंघोळ करण्याचे फायदे

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! 'ही' प्रोसेस ३१ डिसेंबर पर्यंत करा, अन्यथा खात्यात येणार नाही हप्ता

Mahadhan Rajyog: 16 डिसेंबर रोजी या राशींचं नशीब पलटणार; ग्रहांचा राजा सूर्य बनवणार शक्तीशाली योग

Mix Sprouts Bhel Recipe: मोड आलेल्या कडधान्यांची पौष्टिक भेळ कशी बनवायची?

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाटकं करू नये - चव्हाण

SCROLL FOR NEXT