Crop Insurance : २२ हजार शेतकऱ्यांना मिळणार पीकविमा; १५ एप्रिलपासून रक्कम होणार खात्यावर जमा

Sambhajinagar News : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांना सुरक्षा कवच म्हणून पीक विमा काढला होता. खरीप हंगामात पावसाच्या लहरीपणामुळे पिकांचे नुकसान झाले होते.
Crop Insurance
Crop InsuranceSaam tv
Published On

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : मागील काही दिवसांपासून बहुप्रतीक्षीत असलेल्या खरीप २०२३ च्या पीकविम्याची (Farmer) रक्कमेचा पहिला हप्ता देण्यास सुवात करण्यात येत आहे. यामुळे (Sambhajinagar) संभाजीनगर तालुक्यातील २२ हजार ५२४ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर १५ एप्रिलपासून वर्ग होणार असल्याची माहिती पीकविमा कंपनीचे जिल्हा समन्वयक हेमंत शिंदे यांनी दिली. (Maharashtra News)

Crop Insurance
Nandurbar News : बेकायदा जमीन हडपल्याचा आरोप; संतप्त शेतकऱ्यांचा सुजलोन कंपनीत ठिय्या

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांना सुरक्षा कवच म्हणून पीक विमा काढला होता. खरीप हंगामात पावसाच्या लहरीपणामुळे पिकांचे नुकसान झाले होते. यामुळे शेतकऱ्यांनी काढलेल्या पीकविमा (Crop Insurance) योजनेचा लाभ मिळणार होता. याचे पंचनामे होऊन त्याचा अहवाल गेला होता. शिवाय शेतकऱ्यांनी देखील तक्रार दाखल केली होती. त्यानुसार विमा कंपनीकडून ऑनलाईन तक्रार करणाऱ्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देण्यास सुरवात केली आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Crop Insurance
Ahmedpur Fire News : १० शॉपिंग दुकानांना भीषण आग; करोडो रुपयांचे नुकसान, अहमदपूर शहरातील पहाटेची घटना

छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील नुकसानीच्या ऑनलाइन तक्रारींची पडताळणी झालेल्या शेतकऱ्यांनाच या पीकविम्याच्या पहिल्या टप्प्यातील रकमेचा लाभ होणार आहे. त्यामुळे पोर्टलवर नुकसानीच्या ७२ तासांत तक्रारी न केलेल्या ऑफलाईन शेतकऱ्यांची नावे सध्या पीकविमा कंपनीने वगळली आहे. परंतु पीकविमा कंपनीने पहिल्या टप्प्यात ऑनलाइन तक्रारी केलेल्या २२ हजार ५२४ शेतकऱ्यांचाच यात समावेश केला होता. दरम्यान काही दिवसापूर्वी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात केंद्रीय पथकाकडून पाहणी करण्यात आली होती आणि त्यानंतर दुष्काळ जाहीर करण्यात आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com