Raigad, Chhatrapati Shivaji Maharaj, Chhatrapati Sambhaji Maharaj saam tv
महाराष्ट्र

Shivrajyabhishek Sohala 2023 : छत्रपतींची पालखी पाेहचताच 'तुमचं आमचं नातं काय ?, जय जिजाऊ जय शिवराय' घाेषणांनी राजसदर दुमदुमला (पाहा व्हिडिओ)

यंदाच्या वर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी नाशिककरांना मिळाला आहे खास मान.

Siddharth Latkar

- सचिन कदम / अभिजीत साेनावणे

Shivrajyabhishek Din 2023 : किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj) यांचा 350 वा राज्याभिषेक सोहळा (350th shivrajyabhishek sohala) मोठ्या थाटामाटात संपन्न होत असून शिवभक्तांनी मोठी गर्दी केली आहे. गडदेवता शिरकाई देवीच्या पूजना नंतर छत्रपती संभाजी महाराज (chhatrapati sambhaji maharaj) यांची जयंती मोठ्या जोमात साजरी करण्यात आली. छत्रपती संभाजी महाराज यांची पालखी होळीच्या माळावरून राजसदरे वरती आणण्यात आली. या मिरवणुकीत शिवप्रेमींचा उत्साह शिगेला पोहचला होता. भगवे झेंडे, भगव्या पताका यामुळे रायगडावरील संपूर्ण वातावरण भगवेमय बनले आहे. (Maharashtra News)

किल्ले रायगडावर साजऱ्या होणाऱ्या 350 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी संपूर्ण देशाभरातुन अकराशे नद्यांचे पाणी घेऊन येणाऱ्या जलाभिषेक कलश रथयात्रेचे महाडला जंगी स्वागत करण्यात आले. ढोल, ताशे वाजवत फटाके फोडत, शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी नद्यांचे पाणी घेऊन येणाऱ्या कलशांचे पुजन करीत या यात्रेचे स्वागत महाडकरांनी केले.

राजभवन मुंबई येथुन या कलश यात्रेला प्रारंभ झाला. ही यात्रा रायगडावर पोहोचल्यावर विवीध धार्मिक आणि सांस्कृतीक कार्यक्रमांना प्रारंभ होणार आहे.

दरम्यान नाशिक येथे झालेल्या पत्रकार परिषदेत स्वराज्य संघटनेचे करण गायकर यांनी नाशिक येथील शिवभक्तांना रायरेश्वराच्या मंदिराची सजावट करण्याचा मान मिळाल्याचे सांगितले. गायकर म्हणाले 350 सोन्याच्या होनांनी होणार 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न. यंदाच्या वर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी नाशिककरांना मिळाला आहे खास मान.

- नाशिककर शिवभक्त करणार रायरेश्वराच्या मंदिराची सजावट.

- नाशिकचे पाच ढोल पथक, रायरेश्वराच्या पालखीत नाशिकचे वारकरी होणार सहभागी.

- नाशिकच्या राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान वतीने शिवभक्तांसाठी अन्नछत्र उभारण्यात येणार.

- गडावर कुणीही प्लास्टिक बाटली घेऊन न जाण्याचे आवाहन.

- तसेच अंमली पदार्थांचे सेवन न करण्याचे आवाहन

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT