Ram Shinde Threatened: राष्ट्रवादीच्या आमदाराच्या समर्थकाचा प्रताप, भाजप आमदारासह कार्यकर्त्यास जीवे मारण्याची धमकी; गुन्हा दाखल

Video Viral In Social Media: या घटनेचा तपास जामखेड पाेलिस करीत आहेत.
mla ram shinde, mla rohit pawar
mla ram shinde, mla rohit pawarsaam tv

- सुशील थोरात

Nagar News : भाजप आमदार राम शिंदे (mla ram shinde) यांना धमकी दिल्याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात (jamkhed police station) एकावर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान धमकी देणारा संशयित हा राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार रोहित पवार (mla rohit pawar) यांचा समर्थक असल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. (Maharashtra News)

mla ram shinde, mla rohit pawar
AAP Swarajya Yatra : कोल्हापूर महापालिका निवडणुकीचे आम आदमी पार्टी फुंकणार रणशिंग; उद्या 'आप'ची स्वराज्य यात्रा काेल्हापूरात

जामखेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार आमदार राम शिंदे यांना एका युवकाने धमकी दिली. त्याबाबतची फिर्याद अमित चिंतामणी यांनी पाेलिस ठाण्यात दिली. यामध्ये शिवीगाळ करणे, दोन गटात तेड निर्माण करणे, तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी सागर गवसणे या संशियताच्या विरोधात (कलम 504, 505-2, 506-2) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

mla ram shinde, mla rohit pawar
Shivrajyabhishek Sohala : राष्ट्रवादी संपुर्ण महाराष्ट्रात साजरा करणार शिवराज्याभिषेक साेहळा : जयंत पाटील (पाहा व्हिडिओ)

दरम्यान धमकी देणारा सागर गवसणे हा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचा समर्थक असल्याचे समजते. गवसणे याने समाज माध्यमातून लाईव्ह करीत धमकी दिली. तसेच धमकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला.

यामध्ये त्याने आमदार राम शिंदे आणि अमित चिंतामणी या दोघांना धमकी दिली. यापुर्वी देखील सागर गवसणे याच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पाेलिसांकडून मिळाली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com