AAP Swarajya Yatra : कोल्हापूर महापालिका निवडणुकीचे आम आदमी पार्टी फुंकणार रणशिंग; उद्या 'आप'ची स्वराज्य यात्रा काेल्हापूरात

पाच हजार नागरिक निर्धार सभेला उपस्थितीत राहतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
kolhapur, AAP Swarajya Yatra
kolhapur, AAP Swarajya Yatra saam tv

- रणजीत माजगावकर

Kolhapur News : कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आप ने कंबर कसली आहे. राज्यातील शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक व वंचितांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आम आदमी पार्टीच्या (aam aadmi party) वतीने पंढरपूर ते रायगड स्वराज्य यात्रा (aam aadmi party swarajya yatra pandharpur to raigad) काढण्यात आली आहे. (Maharashtra News)

kolhapur, AAP Swarajya Yatra
Shivrajyabhishek Sohala : राष्ट्रवादी संपुर्ण महाराष्ट्रात साजरा करणार शिवराज्याभिषेक साेहळा : जयंत पाटील (पाहा व्हिडिओ)

ही यात्रा 31 मे रोजी कोल्हापुरात येणार असून त्यानिमित्ताने निर्धार सभेचे आयोजन करण्यात आले असल्याचे आपचे कोल्हापूर महापालिका प्रचार समिती कार्याध्यक्ष संदीप देसाई (aap sandeep desai) यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

31 मे रोजी सायंकाळी 5 वाजता दसरा चौक (dasra chowk) येथे स्वराज्य यात्रेचे आगमन होईल. तेथून बाईक व रिक्षा रॅलीने यात्रा बिंदू चौक, आझाद चौक, टेंबे रोड मार्गे मिरजकर तिकटी येथे सभास्थळी पोहचेल.

kolhapur, AAP Swarajya Yatra
Sindhudurg News : ठाकरे गट राष्ट्रवादीत विलीन... नितेश राणेंच्या विधानावर नाईक म्हणाले, हिम्मत असेल तर...

गुजरात मधील लक्षवेधी कामगिरीमुळे आपला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला. सुरत महापालिकेत पहिल्याच प्रयत्नात 27 नगरसेवक तर विधानसभा निवडणुकीत चाळीस लाख मते घेतली.

या निवडणुकीत पक्षाचे नेतृत्व करणारे राष्ट्रीय सह-सचिव व प्रदेश सह-प्रभारी गोपाल इटालिया यांची या निर्धार सभेला प्रमुख उपस्थिती असणार आहे. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपने कंबर कसली आहे. या सभेच्या माध्यमातून आप महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचे बिगुल वाजणार असल्याचे संदीप देसाई यांनी स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com