Rupali Chakankar News : सोशल मीडियावरील अश्लील पेजवर रुपाली चाकणकर यांचा फोटो अपलोड, सायबर सेलने घेतली गंभीर दखल

या प्रकरणाची पाेलिसांनी गंभीर दखल घेतली आहे.
Maharashtra State Commission for Woman chairperson Rupali Chakankar, Social Media, Maharashtra Cyber Cell
Maharashtra State Commission for Woman chairperson Rupali Chakankar, Social Media, Maharashtra Cyber Cellsaam tv

- अक्षय बडवे

Rupali Chakankar News : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर (Maharashtra State Commission for Woman chairperson Rupali Chakankar) यांचा फोटो समाज माध्यमातील (social media) एका अश्लील पेजवर अपलोड करण्यात आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकारणी सायबर सेलने (cyber cell) तपास सुरु केला आहे. (Maharashtra News)

Maharashtra State Commission for Woman chairperson Rupali Chakankar, Social Media, Maharashtra Cyber Cell
Video Viral In Social Media : राष्ट्रवादीच्या आमदाराच्या समर्थकाचा प्रताप, भाजप आमदारासह कार्यकर्त्यास जीवे मारण्याची धमकी; गुन्हा दाखल

समाज माध्यमातील एका पेजवर महिलांचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हीडीओ आढळून आले आहेत. त्याच पेज वर चाकणकर यांचा फोटो अपलोड करण्यात आले आहेत. सुमारे ४ दिवसांपूर्वी रुपाली चाकणकर यांचा फोटो पेज वर अपलोड झाल्याची माहिती मिळत आहे.

Maharashtra State Commission for Woman chairperson Rupali Chakankar, Social Media, Maharashtra Cyber Cell
Shivrajyabhishek Sohala : राष्ट्रवादी संपुर्ण महाराष्ट्रात साजरा करणार शिवराज्याभिषेक साेहळा : जयंत पाटील (पाहा व्हिडिओ)

या प्रकरणी रूपाली चाकणकर यांनी महाराष्ट्र सायबर सेलचे विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव (yashasvi yadav) यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामी करण्याचे प्रकार सर्रासपणे घडत असताना राज्य महिला अध्यक्ष यांचा फोटो फेसबुकच्या त्या पेजवर कोणी अपलोड केला याचा शोध पोलिस घेत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com