दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. अकरावीच्या प्रवेशासाठी तुमच्याकडे दहावीची गुणपत्रिका असणे गरजेचे आहे. जर तुमच्याकडे गुणपत्रिका नसेल तर तुम्हाला अनेक अडचणी येऊ शकतात. दरम्यान, आता विद्यार्थ्यांना २६ मे पासून दहावीचे गुणपत्रक मिळणार आहे.(10th SSC Marksheet)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेच्या गुणपत्रिका आणि तपशीलवार गुण दर्शविणारे शालेय अभिलेख यांचे वाटप माध्यमिक शाळांमार्फत केले जाते. येत्या सोमवारी म्हणजेच २६ मे रोजी दुपारी तीन वाजता करण्यात येणार आहे. राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत दहावीची परीक्षा घेतली होती. फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल १३ मे रोजी जाहीर करण्यात आला. (10th SSC Marksheet Distribution)
या परीक्षेच्या गुणपत्रिका आणि तपशीलवार गुण दर्शविणारे शालेय अभिलेख यांचे वाटप विभागीय मंडळांमार्फत सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक शाळांना सोमवारी सकाळी अकरा वाजता करण्यात येणार आहे. त्यानंतर माध्यमिक शाळांमार्फत दुपारी तीन वाजता विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप केले जाईल.
गुणपत्रिका ही खूप महत्त्वाची असते. तुम्हाला फक्त अकरावीसाठी नव्हे तर भविष्यात नेहमीच तुम्हाला दहावीच्या गुणपत्रिकेची आवश्यकता असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शाळेत जाऊन गुणपत्रक घ्यायचे आहे. याबाबत शाळा तुम्हाला माहिती देईलच. त्यानुसार तुम्हाला शाळेत जाऊन मार्कशीट घ्यायचे आहे.
दहावीत जे विद्यार्थी नापास झालेत त्यांची पुरवणी परीक्षा ही २४ जून ते १७ जुलै या कालावधीत होणार आहे. दहावीचे ८६६४१ विद्यार्थी पुनर्परीक्षेसाठी पात्र आहेत. त्यातील ३४३९३ विद्यार्थी एटीकेटीसाठी पात्र आहेत. या विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा घेतली जाणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.