10th-12th: दहावी - बारावीत ५० टक्के मिळालेत? मग तुम्हाला १० हजार मिळणार; काय आहे सरकारची योजना?

Scholarship for Students: दहावी - बारावी शैक्षणिक आर्थिक सहाय्य योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना सरकारद्वारे आर्थिक मदत केली जाते. यामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळते.
10th-12th Exam
10th-12th ExamSaam TV
Published On

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नुकताच दहावीचा निकाल जाहीर केला. राज्याचा एकूण ९४ टक्के निकाल लागला असून, यंदाही मुलींनी बाजी मारली. राज्य सरकारकडून कामगारांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक प्रोत्साहन म्हणून एक महत्त्वाची योजना राबवली जाते. 'दहावी - बारावी शैक्षणिक आर्थिक सहाय्य योजना' असे योजनेचे नाव आहे.

या योजनेद्वारे दहावी आणि बारावीत पास झालेल्या विद्यार्थ्यांना सरकारकडून १०,००० रुपये दिले जातात. जर, आपल्या पाल्याला दहावीत ५० टक्के मिळाले असतील, तर त्यांनाच या सरकारी योजनेचा लाभ मिळेल.

10th-12th Exam
Sanjay Raut: 'अमित शहांना फोन करू का?' ईडीकडून अटक होण्याआधी एकनाथ शिंदेंचा फोन; संजय राऊतांचा गौप्यस्फोट

ही योजना नेमकी काय आहे?

राज्य सरकार महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे नोंदणीकृत कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवते. यापैकी एक म्हणजे, 'दहावी ते बारावी शैक्षणिक आर्थिक सहाय्य योजना'. या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांच्या जास्तीत जास्त २ मुलांना दहावी किंवा बारावीत ५० टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळाल्यास शिष्यवृत्ती दिली जाईल.

10th-12th Exam
Hair Transplant: हेअर ट्रान्सप्लांट जीवाशी, १५ दिवसांत चेहऱ्याचा आकारच बदलला; फोटो पाहून अंगावर येईल काटा

योजनेचे वैशिष्ट्ये

दहावी किंवा बारावीत ५० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळाल्यास विद्यार्थ्यांना १०,००० रूपयांची शिष्यवृत्ती दिली जाते.

शिष्यवृत्ती फक्त बांधकाम कामगारांच्या जास्तीत जास्त २ मुलांना दिली जाते.

या योजनेचा उद्देश कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्याचे प्रयत्न.

10th-12th Exam
Tuljapur: जेवला अन् झोपला, रात्रभर वेदनेनं विव्हळत; एकुलत्या एक मुलाचा झोपेतच हार्ट ॲटॅकनं मृत्यू

शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्रता

विद्यार्थ्याचे पालक महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे नोंदणीकृत सदस्य असावेत.

विद्यार्थी आणि त्याचे कुटुंब महाराष्ट्राचे नागरिक असावे.

अर्जदाराला दहावी किंवा बारावीत किमान ५० टक्के गुण असणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com