ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल जाहीर करण्याच्या तारखा जाहीर केल्या आहेत.
यंदा मंगळवारी १३ मे २०२५ रोजी दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
दहावीचा निकाल तुम्ही https://www.mahahsscboard.in/ या अधिकृत वेबसाईटवर पाहता येणार आहे.
तुम्हाला जर गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र हवे असल्यास तुम्ही पुढील स्टेप्स द्वारे सहज आणि सोप्या पद्धतीने डाउनलोड करू शकता.
सगळ्यात आधी तुम्ही digiloker या अॅप किंवा वेबसाईटवर जा.
पुढे तुमचा मोबाईल नंबर, आधार पिन वापरून साइन इन करा.
पुढे 'Education' या विभागात जा.
पुढे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE)हा पर्याय निवडा.
SSC Marksheet 2025 हा पर्याय दिसल्यास त्यावर क्लिक करा.
त्यावर तुमची संपुर्ण माहिती अचूक भरा आणि डिजीटल मार्कशीट मार्कशीट डाउनलोड करून घ्या.