ram shinde And mla rohit pawar saam tv
Maharashtra Assembly Elections

Karjat Jamkhed News: जुनीच लढत नव्या रुपाने, कर्जत-जामखेडमध्ये कोण बाजी मारणार? रोहित पवार अन् राम शिंदेंमध्ये अटीतटीचा सामना

Maharashtra Assembly Election: सध्या राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहे. दरम्यान सर्वांचेच लक्ष कर्जत जामखेड मतदारसंघाकडे लागलं आहे. या मतदारसंघात रोहित पवार विरुद्ध राम शिंदे अशी लढत पाहायला मिळणार आहे.

Siddhi Hande

राज्यात कर्जत जामखेडची लढत लक्षवेधी असल्याची चर्चा रंगलीय.. त्यातच शरद पवारांचे नातू रोहित पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय राम शिंदे यांच्यात थेट लढत होणार आहे. मात्र कर्जत जामखेडचा प्रचार कोणत्या मुद्द्यांभोवती फिरत आहे? तसंच कर्जत जामखेडचं जातीय समीकरण नेमकं कसं आहे? त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट...

कर्जत-जामखेडचं महाभारत!

राज्यातील हाय होल्टेज लढतींपैकी एक असलेल्या कर्जत जामखेडमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलंय.. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने रोहित पवारांना तर भाजपने विधानपरिषदेचे आमदार राम शिंदेंना रिंगणात उतरवलंय.. त्यामुळे कर्जत-जामखेडमध्ये पुन्हा शिंदे विरुद्ध पवार लढत रंगणार आहे. मतदारसंघात भुमिपूत्र विरुद्ध बाहेरचा या मुद्द्याभोवती प्रचार फिरत आहे. मात्र दोन्ही उमेदवारांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलाय..

राम शिंदे, उमेदवार, भाजप

1972 मध्ये निर्माण झालेल्या कर्जत-जामखेड मतदारसंघावर 1995 मध्ये एकपक्षीय वर्चस्व निर्माण झालं नव्हतं. कधी काँग्रेस, कधी जनसंघ, कधी रिपब्लिकन पक्षाने या मतदारसंघातून विजय मिळवला. मात्र 1995 नंतर सलग 25 वर्षे कर्जत जामखेड मतदारसंघावर भाजपचं एकहाती वर्चस्व होतं. मात्र 2019 मध्ये अँटी इन्कम्बन्सीचा फायदा उठवत रोहित पवारांनी भाजपचा गड भेदला. मात्र 2019 मध्ये या मतदारसंघाचं मतांचं समीकरण नेमकं कसं होतं? पाहूयात...

2019 मधील मतांचं समीकरण

रोहित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस, 1 लाख 35 हजार 824 मतं

प्रा.राम शंकर शिंदे, भाजप, 92 हजार 477 मतं

43 हजार 347 मतांनी रोहित पवारांचा विजय

कर्जत जामखेड मतदारसंघ मराठवाड्याच्या सीमेवर असल्याने जरांगे फॅक्टर चर्चेत आहे. तर दुसरीकडे भाजपचा पारंपरिक माधव पॅटर्नही प्रभावी ठरम्याची शक्यता आहे. मात्र कर्जत-जामखेडचं जातीय समीकरण नेमकं कसं आहे? पाहूयात...

कर्जत-जामखेडमधील जातीय समीकरण (हेडर)

ओबीसी- 1 लाख 28 हजार

मराठा- 1 लाख 20 हजार

मुस्लीम- 30 हजार

एससी- 42 हजार

एके काळी दुष्काळी मतदारसंघ अशी ओळख असलेल्या कर्जत-जामखेडमध्ये राम शिंदे मंत्री असताना जलसंधारणाची कामं मार्गी लागली. कुकडी आणि तुकाई चारीचा प्रश्न मार्गी लावण्याचं काम शिंदेंनी केलं. तर रोहित पवारांनी दुष्काळ असताना टँकरने पाणीपुरवठा करत लोकांना साद घातली. त्यानंतरही जातीय धृवीकरण, एमआयडीसीचा तापलेला मुद्दा, भुमिपूत्र आणि बाहेर उमेदवार याबरोबरच विकासकामांचा श्रेयवाद या मुद्द्यांवरून जनता रोहित पवारांना कौल देणार की त्यांचा विजयरथ रोखणार? याकडे लक्ष लागलंय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नवी मुंबई महानगरपालिकेचे ठेकेदारांनी अर्धवट काम करून बिल काढली

गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसली, धावत्या बसमध्ये शारीरिक संबंध; VIDEO व्हायरल करत प्रवाशांनी झापलं

Dhodhadi Waterfall: मुंबईपासून फक्त साडेतीन तासांच्या अंतरावर आहे हा सुंदर धबधबा, पुढचा प्लान इथे नक्की करा

Child Brain Health : लहान मुलांना हे पदार्थ देताय? सावधान! अन्यथा मेंदूवर होईल परिणाम

Reshma Shinde: माझ्या नयनी नक्षत्र तारा आणि चांद तुझ्या डोळ्यात...

SCROLL FOR NEXT