Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुंबई : राज्यात निवडणूकीची धामधूम सुरू आहे. निवडणूकाच्या रिंगणात उतरलेल्या सर्वच पक्ष आणि उमेदवारांनी कंबर कसली आहे. राजकारणात कोणीच कोणाचा सख्खा नसते असे म्हणतात. त्यामुळे बंडखोरी करणाऱ्यांची देखील पक्षासमोर एक डोकेदुखी असते. काँग्रेसला सध्या बंडाळीचा झळ सहन करावी लागत आहे. महाराष्ट्र काँग्रेसने रविवारी 28 बंडखोर उमेदवारांना पक्षविरोधी कारवायांसाठी सहा वर्षांसाठी निलंबित केले. 22 विधानसभा मतदारसंघातून हे उमेदवार महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध निवडणूक लढवत आहेत.
या नेत्यांवर केली कारवाई
कारवाईला सामोरे गेलेल्या प्रमुख नेत्यांमध्ये रामटेक मतदारसंघातील माजी मंत्री राजेंद्र मुळक , काटोल येथील याज्ञवल्क जिचकार, कसबा येथील कमल व्यवहारे, कोपरी-पाचखडी मतदार संघातील मनोज शिंदे आणि आबा बागुल यांचा समावेश आहे. एआयसीसीचे प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या सूचनेवरून हा निर्णय घेण्यात आल्याचे काँग्रेसच्या निवेदनात म्हटले आहे.
एकूण 28 नेत्यांना दाखवण्यात आला बाहेरचा रस्ता
नव्याने निलंबित करण्यात आलेल्या नेत्यांमध्ये शामकांत सनेर, राजेंद्र ठाकूर, आबा बागुल, मनीष आनंद, सुरेश कुमार जेथलिया, कल्याण बोराडे आणि चंद्रपॉल चौकसे यांचा समावेश आहे. आदल्या दिवशी पक्षाने आणखी 21 बंडखोरांना निलंबित केले, 22 मतदारसंघात एकूण निलंबनाची संख्या 28 झाली आहे.
यापूर्वी निलंबित करण्यात आलेल्या नेत्यांच्या यादीत आनंदराव गेडाम, शिलू चिमुरकर, सोनल कोवे, भरत येरमे, अभिलाषा गावतुरे, प्रेमसागर गणवीर, अजय लांजेवार, विलास पाटील, अस्मा जावद चिखलेकर, हंसकुमार पांडे, कमल व्यवहारे, मोहनराव मंगळवेढा, भुजबळ दांडे, कमल व्यवहारे यांचा समावेश आहे. शिंदे, सुरेश पाटीलखेडे, विजय खडसे, शब्बीर खान, अविनाश लाड यागवाल्या जिचकार, राजू झोडे, राजेंद्र मुख यांचा समावेश आहे.
पक्षाने आधीच दिला होता इशारा
हे निलंबित उमेदवार महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध निवडणूक लढवत आहेत. यापूर्वी, काँग्रेस नेते रमेश चेन्निथला म्हणाले होते की अधिकृत महाविकास आघाडीच्या उमेदवारांविरुद्ध लढणाऱ्या सर्व पक्षीय बंडखोरांना सहा वर्षांच्या निलंबनाला सामोरे जावे लागेल.
महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक 20 नोव्हेंबरला होणार असून, 23 नोव्हेंबरला सर्व 288 मतदारसंघांसाठी मतमोजणी होणार आहे. विरोधी महाविकास आघाडी युती, ज्यामध्ये काँग्रेस, शिवसेना उबाठा, आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांचा समावेश आहे. बंडखोरीमुळे महाविकास आघाडीची सरकार पडले होते. पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी आता जोरदार प्रयत्न सुरू आहे.
दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, भाजप आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश असलेली महायुती पुन्हा सरकार स्थापनेसाठी प्रयत्नशील आहे. लाडकी बहिण योजनेचा प्रचार तळागळातले कार्यकर्ते करताना दिसत आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.