विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी महाविकास आघाडीतील दुसऱ्या पक्षाने उमेदवार देऊन देखील इच्छुक असणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवारांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केले. अशा बंडखोरांविरोधात काँग्रेसने कारवाई केली आहे. काँग्रेसने रविवारी बंडखोरी करत विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या १६ उमेदवारांवर कडक कारवाई केली आहे. या १६ बंडखोर उमेदवारांना ६ वर्षांसाठी काँग्रेसकडून निलंबन करण्यात आले आहे. महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांनी महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांविरोधात निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसच्या १६ बंडखोर उमेदवारांना सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे. तर दुसरीकडै भाजपने मंगळवारी ३७ विधानसभा मतदारसंघातील ४० नेते आणि पदाधाकिरी ज्यांनी पक्षाच्या विरोधात भूमका घेतली त्यांची हकालपट्टी करण्यात आली.
दरम्यान, महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या एकूण २८८ जागांसाठी मतदान होणार आहे. निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतशी महायुती आणि महाविकास आघाडीतील लढत आणखी रंगतदार आणि चुरशीची होत आहे. २० नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे.
आमरोली - आनंदराव गेडाम आणि शिलु चिमूरकर
गडचिरोली - सोनल कोवे आणि भरत येरमे
बल्लारपूर - अभिलाषा गावतूरे आणि राजू झोडे
भंडारा - प्रेमसागर गणवीर
अर्जुनी मोरगांव - अजय लांजेवार
भिवंडी - विलास पाटील आणि आसमा जव्वाद चिखलेकर
मिरा भाईंदर - हुंसकुमार पांडे
कसबा पेठ - कमल व्यवहारे
पलूस कडेगाव - मोहनराव दांडेकर
अहमदनगर शहर - मंगल विलास भुजबळ
कोपरी पाचपाखाडी - मनोज शिंदे आणि सुरेश पाटील खेडे
उमेरखेड - विजय खडसे
यवतमाळ - शबीर खान
राजापूर - अविनाश लाड
कटोल - याज्ञवल्क्य जिचकार
रामटेक - राजेंद्र मुळक
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.