Maharashtra Politics: क्लिनिक चालवणाऱ्याकडे कोट्यवधीची प्रॉपर्टी कुठून आली? शिंदेंच्या आमदाराला सुषमा अंधारेंचा सवाल

Sushma Andhare Criticized Balaji Kinikar: अंबरनाथ विधानसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश वानखेडे यांच्या प्रचारासाठी सुषमा अंधारे यांनी शनिवारी अंबरनाथ विधानसभेतील उल्हासनगर कॅम्प ४ भागात सभा घेतली.
Maharashtra Politics: क्लिनिक चालवणाऱ्याकडे कोट्यवधीची प्रॉपर्टी कुठून आली? शिंदेंच्या आमदाराला सुषमा अंधारेंचा सवाल
Sushma Andhare Criticized Balaji KinikarSaam Tv
Published On

अजय दुधाणे, उल्हासनगर

'कधीकाळी साधं छोटं क्लिनिक चालवणाऱ्या बालाजी किणीकर यांच्याकडे आज करोडोंची प्रॉपर्टी कुठून आली?', असा सवाल करत शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी अंबरनाथचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्यावर निशाणा साधला. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. तर सुषमा अंधारे यांच्या या आरोपावर बालाजी किणीकर यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे.

अंबरनाथ विधानसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश वानखेडे यांच्या प्रचारासाठी सुषमा अंधारे यांनी शनिवारी अंबरनाथ विधानसभेतील उल्हासनगर कॅम्प ४ भागात सभा घेतली. यावेळी भाषणात त्यांनी शिंदे गटाचे स्थानिक आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्यावर टीका केली. आमदार बालाजी किणीकर हे नेमके कुठे कष्ट करायला गेले? असं म्हणत असा कोणता अल्लाउद्दीनचा दिवा घासला आणि कुठे इतकी मेहनत केली की ज्यामुळे तुमच्याकडे इतके पैसे आले? असा सवाल सुषमा अंधारे यांनी विचारला. या चाळीसच्या चाळीस गद्दारांकडे पैसे आले, पण सर्वसामान्यांचा खिसा कापला गेला, अशी टीका अंधारे यांनी यावेळी केली.

Maharashtra Politics: क्लिनिक चालवणाऱ्याकडे कोट्यवधीची प्रॉपर्टी कुठून आली? शिंदेंच्या आमदाराला सुषमा अंधारेंचा सवाल
Maharashtra Politics: ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंनी दिला भिवंडीत झटका; माजी आमदारासह असंख्य कार्यकर्ते शिवसेनेत

आमदार बालाजी किणीकर यांनी देखील सुषमा अंधारे यांनी केलेल्या वक्तव्याला चोख प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी सांगितले की, 'सुषमा अंधारे यांनी केलेले आरोप खोटे असून मी डेंटिस्ट आहे. माझ्याकडे २ दवाखाने होते. माझी पत्नीही डेंटिस्ट असून मी शिवसैनिक म्हणून काम करत होतो. त्यामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मला उमेदवारी दिली. त्यामुळेच गेली १५ वर्षे या शहराचं मी प्रतिनिधित्व करतोय. मी माझ्या ऍफिडेव्हिटमध्ये माझे काय व्यवसाय आहेत ते दिलेलं आहे. मी काय कमावलं तेही दिलेलं आहे. मी खोटी ऍफिडेव्हिट देणारा माणूस नसून जे सत्य आहे ते दिलेलं आहे. ताईंनी ते बघावं आणि मग माझ्यावर टीका कराव्यात. ताई मोठ्या नेत्या आहेत.' अशी प्रतिक्रिया किणीकर यांनी दिली.

Maharashtra Politics: क्लिनिक चालवणाऱ्याकडे कोट्यवधीची प्रॉपर्टी कुठून आली? शिंदेंच्या आमदाराला सुषमा अंधारेंचा सवाल
Maharashtra Politics : महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? अमित शहांच्या वक्तव्यानंतर भाजपमधून आली पहिली प्रतिक्रिया

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com