Nandurbar Politics: एक नंबरच्या मतदारसंघात चौरंगी लढत, कोण उधळणार विजयी गुलाल?

Maharashtra Assembly Election: एक नंबरच्या मतदारसंघात म्हणजेच नंदुरबारमध्ये या विधानसभा निवडणुकीत चांगलीच लढत पाहायला मिळणार आहे. अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
Nandurbar Politics
Nandurbar PoliticsSaam Tv
Published On

सागर निकवाडे, नंदुरबार

नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा अक्राणी विधानसभेत चौरंगी लढत...

राज्यातील क्रमांक एकचा मतदार संघ असलेल्या अक्कलकुवा अक्राणी मतदार संघात जिल्ह्यातील सर्वात मोठी लढत पाहायला मिळणार आहे .. गेल्या 35 वर्षांपासून के सी पाडवी अक्कलकुवा विधानसभेचे आमदार आहेत या मतदारसंघात यावेळी सर्वाधिक चुरस पाहायला मिळत असून दोन माजी मंत्री एक माजी खासदार तर एक विद्यमान विधान परिषद आमदार या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असून या दिग्गजांची प्रतिष्ठाता आता पणाला लागलेली आहे... पाहूयात साम टीव्हीच्या हा स्पेशल रिपोर्ट....

अक्कलकुवा अक्राणी विधानसभा क्षेत्र हा काँग्रेसच्या गड मानला जातो गेल्या 35 वर्षांपासून या मतदारसंघातून काँग्रेसचे के सी पाडवी हे निवडून येत आहेत 2019 च्या निवडणुकीत केसी पाडवी यांनी निसटता विजय मिळवला असला तरी या मतदार संघात त्यांचा दबदबा आज पण कायम आहे. 2024 च्या या लोकसभा निवडणुकीत त्यांनी आपल्या चिरंजीव गोवा पाडवी यांना उभ करत निवडून आणलं दोन टर्म खासदार असलेल्या डॉ हिना गावित यांचा पराभव करत 1 लाख 59 हजार मतांनी गोवाल पाडवी यांनी विजय मिळवला आहे. यामुळे नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेसला चांगले दिवस आले असले तरी ते किती दिवस टिकणार हे पाहणं महत्वाचं असेल...

Nandurbar Politics
Kolhapur Politics: धनंजय महाडिकांना निवडणूक आयोगाचा दणका, 'त्या' आक्षेपार्ह विधानाप्रकरणी नोटीस

के सी पाडवी , काँग्रेस उमेदवार

लोकसभा निवडणुकीचा वचपा काढण्यासाठी माजी खासदार हिना गावित आता थेट विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उभी असून माजी मंत्री असलेल्या के सी पाडवी यांना आव्हान दिले आहे लोकसभा निवडणुकीच्या बदला घेण्यासाठी त्यांनी डॉक्टर हिना गावित यांनी अक्कलकुवा अक्राणी विधानसभेतून उमेदवारीची मागणी केली होती मात्र महायुतीकडून ही जागा शिंदे शिवसेनेला सुटली असून विद्यमान विधान परिषदेचे आमदार आमच्या पाडवी यांना महायुती गटाचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी लोकसभेत काँग्रेसला मदत केल्याने हिना गावित यांचा पराभव झाला यामुळे ही जागा भाजपला द्यावी अशी मागणी या गावी त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली होती मात्र तरीदेखील ही जागा शिवसेना शिंदे गटाला मिळाली यामुळे हिना गावित यांनी भाजप सदस्यता चा आणि राष्ट्रीय प्रवक्ते पदाचा राजीनामा देत अपक्ष उमेदवारी करण्याच्या निर्णय निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून आपण खासदार असताना या मतदारसंघात अनेक विकास कामे केली असून त्यामुळे येथील जनता मला निवडून देईल असा विश्वास देखील हिना गावित यांनी साम टीव्हीशी बोलताना व्यक्त केला....

Nandurbar Politics
Maharashtra Politics: क्लिनिक चालवणाऱ्याकडे कोट्यवधीची प्रॉपर्टी कुठून आली? शिंदेंच्या आमदाराला सुषमा अंधारेंचा सवाल

डॉ हिना गावित, अपक्ष

तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांनी आपल्या मुलासाठी उमेदवारीची मागणी केली होती मात्र त्यांच्या मुलाला उमेदवारी न देता शिवसेना शिंदे गटांनी त्यांनाच महायुतीच्या उमेदवार म्हणून घोषित केल्याने महायुतीत अंतर्गत वाद निर्माण झालेला आहे. 2019 मध्ये आमश्या पाडवी हे शिवसेनेचे उमेदवार होते त्यावेळी मात्र थोड्याफार फरकाने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला गेल्या 35 वर्षांपासून के सी पाडवी हे आमदार आहेत मात्र या भागाचा त्यांनी कोणताही विकास केलेला नाही आदिवासींना न्याय मिळाला नाही म्हणूनच मी विधानसभा निवडणूक लढवण्याचे निश्चित केला असल्याचं आमश्या पाडवी यांनी सांगितलं....

आमश्या पाडवी , महायुती उमेदवार शिव सेना शिंदे गट...

काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री असलेले पद्माकर वळवी यांनी काही महिन्यांपूर्वीच काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपा प्रवेश केला मात्र काही दिवसातच त्यांनी भाजपालाही राम राम करत पक्षाचा राजीनामा दिला काँग्रेसचे के सी पाडवी यांच्याशी मतभेद असल्याने त्यांनी थेट केसी पाडवींना आवाहन देत त्यांच्याच मतदार संघातून आदिवासी पार्टीच्या वतीने ते उमेदवारी करत आहेत पद्माकर वळवी यांच्या उमेदवारीमुळे काँग्रेसचीच डोकेदुखी वाढणार आहे याचा नेमका फायदा कोणाला होणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचा असणार आहे...

Nandurbar Politics
Maharashtra Politics: घरातून बाहेर न निघणाऱ्यांना १५०० रुपयांची किंमत काय कळणार? श्रीकांत शिंदे यांचा विरोधकांना टोला

2019 च्या विधानसभा निवडणूक मिळालेली मते

1 ) 2019 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे के सी पाडवी यांना 82 हजार 770 मते मिळाली होती... त्यांचा विजय झालं होता..

2 ) 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेचे आमश्या फुलजी पाडवी यांना 80 हजार 674 मते मिळाली होती. 2096 मतांनी आमश्या पाडवी यांचा पराभव झाला होता.

अक्कलकुवा अक्राणी विधानसभेतील जातीय समीकरण...

नंदुरबार जिल्हा हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो. नंदुरबार जिल्ह्यातील चारही मतदार संघ आदिवासींसाठी आरक्षित असून अक्कलकुवा विधानसभा देखील आदिवासींसाठी राखीव या मतदार संघात 80% मतदार हे आदिवासी आहेत त्या पाठोपाठ या मतदारसंघात अनुसूचित जाती 2 टक्के ,इतर मागास वर्गीय 10 टक्के , अल्पसंख्यांक 2 टक्के आणि खुला प्रवर्ग 6 टक्के मतदार असून सर्वाधिक मतदार आदिवासी आहेत...

अक्कलकुवा मतदारसंघात गेल्या 35 वर्षांपासून काँग्रेसचे के सी पाडवी निवडून येत आहेत. मात्र आजही धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यात अनेक गावांना जोडणारे रस्ते नाहीत तर दुसरीकडे अनेक नद्यांना पूल नसल्यामुळे गर्भवती महिलांना बांबूच्या झोलितजीवघेणा प्रवास करावा लागत असल्याची स्थिती आजही या भागात कायम आहे.. या भागात आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्ध नसल्यामुळे त्यांना रोजगार असतात इतर जिल्ह्यात आणि राज्यात स्थलांतर करावं लागत असल्याची भीषण परिस्थिती या भागात आहे सीताफळ आणि आमचुल प्रक्रियेचं हब मानला जाणाऱ्या या धडगाव तालुक्यात आज पर्यंत एकही उद्योग धंदा निर्माण झालेला नाही विज आणि नेटवर्कची समस्या हे देखील या भागात कायम असल्यामुळे या भागातील आदिवासींच्या मरण यातना संपत नसल्याची स्थिती आहे

या मतदार संघात 80 टक्के जनता ही आदिवासी असल्यामुळे आदिवासींच्या कौल निर्णय ठरणार आहे या विधानसभेच्या प्रतिनिधित्व येणाऱ्या काळात कोण करतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे..

Nandurbar Politics
Maharashtra Politics : ऐन विधानसभा निवडणुकीत राडा; धारावीत काँग्रेस आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले, VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com