Anant Chaturdashi 2025 live updates : गणपती विसर्जन मिरवणुकीत मंत्री गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांसोबत ठेका धरला

Ganesh Visarjan 2025 live updates : लाडक्या गणरायांना आज भावपूर्ण वातावरणात निरोप दिला जाणार आहे. मुंबई, पुण्यासह राज्यातील सार्वजनिक मंडळांसह, घरगुती गणपतींच्या विसर्जन मिरवणुकांचा जोर असेल. गणेश विसर्जनाचे क्षणा क्षणाचे लाईव्ह अपडेट...
Anant Chaturdashi 2025 live updates
MAHARASHTRA BIDS FAREWELL TO LORD GANESHA ON ANANT CHATURDASHI WITH GRAND IMMERSIONSSaam TV Marathi News
Published On

गणपती विसर्जन मिरवणुकीत मंत्री गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांसोबत ठेका धरला

जळगाव शहरात गणपती विसर्जन मिरवणुकीत मंत्री गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांसोबत ठेका धरला.

आज जळगाव शहरातील विसर्जन मिरवणुकीत मंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थिती दिली.

Kolhapur : गणेश विसर्जन मिरवणुकीत आमदार सतेज पाटील यांचा डान्स

कोल्हापुरातील गणेश विसर्जन मिरवणुकीत आमदार सतेज पाटील यांचा डान्स

काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी धरला डॉल्बीवर ठेका

मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घेतलं सतेज पाटील यांना खांद्यावर

डीजेच्या ठेक्यावर सतेज पाटलांनी केला कार्यकर्त्यांसोबत डान्स

pune : पुण्यात विसर्जनासाठी गेलेले चार जणांचा पाण्यात बुडून मृत्यू 

पुण्यातील चाकण परिसरात वेगवेगळ्या घटनांमध्ये गणेश विसर्जनासाठी गेलेले चार जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना समोर आलीय. यामध्ये वाकी खुर्द येथील भामा नदीत दोन जण, बिरदवडी येथील विहिरीत एक जण, शेलपिंपळगाव येथील भीमा नदीत एक जण अशा वेगवेगळ्या घटनात चार जण बुडाल्याची दुदैवी घटना घडली.

पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीला १२ तास पूर्ण

पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीला १२ तास पूर्ण झाले आहेत.

दगडूशेठ गणपतीचे रात्री ९ वाजून २३ मिनिटांनी विसर्जन पूर्ण

सकाळी ९.३० वाजता सुरू झाली होती, पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांची विसर्जन मिरवणूक

पुण्यातील लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्त्यावरून विविध गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका सुरू आहेत.

अलका टॉकीज चौकात "श्रीमंत" दाखल

Summary

अलका टॉकीज चौकात "श्रीमंत" दाखल झालाय.

श्रीमंत दगडूशेठ गणपती अलका टॉकीज चौकात दाखल

श्री गणनायक रथात दगडूशेठ गणपती बाप्पा विराजमान हजारोंच्या विद्युत दिव्याने सजलेला रथ

अलका टॉकीज चौकात दाखल भाविकांचा मोठा जनसागर

अलका चौकात दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची या चौकात अलोट गर्दी

नागपुरातील दक्षिणामूर्ती गणेश मंडळाचा गणपती बडकस चौकात पोहचणार

नागपुरातील दक्षिणामूर्ती गणेश मंडळाचा गणपती बडकस चौकात पोहोचला आहे.

त्यानंतर विसर्जन मिरवणुकीच ल्हास आकर्षण असणारा फटाक्यांचा रंगबिरंगी, आतिषबाजी शो पाहण्यासाठी नागपुरात बडकस चौकात प्रचंड गर्दी झाली आहे.

वेगवेगळ्या रंगाच्या फटाके आणि फटाक्याच्या माध्यमातून आकर्षक, आक्षणात आणि गणपती मूर्तीच्या आजू बाजूला फायर शो पाहायला मिळेल.

लाडक्या बाप्पाला निरोप देताना लहान मुलांना अश्रू अनावर

पुण्यात लाडक्या बाप्पाला निरोप देताना लहान मुलांना अश्रू अनावर

आई-वडील आणि पालिका कर्मचारी समजूत काढली

गणपती देव हा आपला वाटतो, त्याच भावना या चिमुकल्यांकडून व्यक्त होत आहेत

कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणूक रेंगाळली

कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणूक रेंगाळली आहे. महाद्वार रोडवर अनेक मंडळे आहेत. त्याच ठिकाणी ही गणेशोत्सव विसर्जन मिरवणुक रेंगाळली आहे. कार्यकर्ते पोलिसांचे ऐकत नसल्यानं मिरवणूक रेंगाळली ही मिरवणुक रेंगाळली आहे.

पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीला दहा तास पूर्ण

सकाळी साडे नऊ वाजता मिरवणुकीला सुरुवात झाली. मानाच्या पाचही गणपतीचे विसर्जन झाले. काही वेळात श्रीमत दगडूशेठ गणपती अलका चौकात येईल पुण्यातील मानाच्या पाच ही गणपतींचे मोठ्या उत्साहात विसर्जन संपन्न झाला. ढोल ताशांच्या गजरात मानाच्या गणपतीना पुणेकरांनी दिला निरोप देण्यात आला

माजी खासदरनवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्याकडून गणरायाचे विसर्जन

अनंत चतुर्दशीच्या शुभदिनी भाजप नेत्या व माजी खासदार नवनीत राणा तसेच बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी आपल्या गणरायाला भावपूर्ण निरोप दिला.घरगुती उत्साहात पार पडलेल्या या सोहळ्यात दाम्पत्याने गणपती बाप्पाची मनोभावे पूजा-अर्चना केली. पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात व गणपती बाप्पा मोरया च्या जयघोषात बाप्पाचे विसर्जन करण्यात आले.

नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून निर्माल्य संकलन; खत निर्मिती उपक्रमाला महापालिकेचं कौतुक

जुहू चौपाटीवर डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे निर्माल्य गोळा करण्याचं काम करण्यात आलं. संकलित निर्माल्यापासून सेंद्रिय खत तयार करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. महापालिका सहाय्यक आयुक्त चक्रपाणी आले यांनी या उपक्रमाचं विशेष कौतुक करत पर्यावरणपूरक कार्यासाठी संस्थेचं अभिनंदन केलं.

पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

पुण्यातील मानाच्या पाच ही गणपतींचे मोठ्या उत्साहात विसर्जन संपन्न झाला. ढोल ताशांच्या गजरात मानाच्या गणपतीना पुणेकरांनी दिला निरोप देण्यात आला. मानाच्या पहिला कसबा गणपतीच विसर्जन तीन वाजून ४७ मिनिटांनी. दुसरा मानाचा तांबडी जोगेश्वरी गणपतीचे विसर्जन चार वाजून १० मिनिटांनी पार पडले. तिसरा मानाचा गुरुची तालीम गणपतीचे नटराज घाट या ठिकाणी विसर्जन चार वाजून ३५ मिनिटाने पार पडला. मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपतीचे पांचाळेश्वर घाट येथे विसर्जन पाच वाजून पार पडला आहे. मानाचा पाचवा केसरीवाडा गणपतीचे विसर्जन घाटावर कृत्रिम हौदात पाच वाजून ४० मिनिटांनी पार पडला.

वर्धा जिल्ह्यात भक्तिभावात बाप्पांना निरोप

- पूजा अर्चा करत घरगुती गणेश मूर्तींचं विसर्जन

- अनेक सार्वजनिक गणेश मंडळाकडूनही मूर्तींचे विसर्जन

- वर्धा शहरात नगरपालिकेच्या वतीने विविध ठिकाणी कृत्रिम कुंडांची सुविधा

- सामाजिक संघटनांच्या वतीने ही पर्यावरण पूरक गणेश मूर्ती विसर्जनाकरिता कृत्रिम कुंड

- पर्यावरण पूरक गणेश मूर्ती विसर्जन करणाऱ्या भाविकांना नगरपालिकेच्या वतीने प्रमाणपत्र

- पर्यावरण पूरक निर्मळ गणेश मूर्ती विसर्जनाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मिरवणूक रथात विराजमान

आकर्षक विद्युतरोषणाईने हा रथ उजळून निघणार आहे.श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे यंदा केरळ मधील श्री पद्मनाथ स्वामी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे.या मंदिराला अनुसरून या विसर्जन रथाची मांडणी करण्यात आली आहे.

पुण्याच्या गणेशोत्सवातील पहिला मानाचा कसबा गणपतीचं विसर्जन

पहिला मानाचा कसबा गणपतीची विसर्जन मिरवणूक चांदीच्या पालखीतुन पोहोचली असुन ढोल-ताशांच्या गजरात विसर्जन पार पडत आहे.

धाराशिवमध्ये जय मल्हार तरुण मंडळाने डीजेला बगल देत पारंपारिक पोतराज नृत्य सादर करत आपल्या बाप्पाची काढली मिरवणूक

धाराशिव शहरातील जय मल्हार तरुण मंडळ देवकते गल्ली यांनी डॉल्बी, डीजेला बगल देत लोप पावत चाललेली पारंपारिक पोतराज कला सादर करत मंडळातील सदस्यांनी मरीआई लक्ष्मी आणि पोतराजाची वेशभूषा करून आपल्या लाडक्या बाप्पांची मिरवणूक काढली.या मंडळातील कलाकारांनी पारंपारिक पोतराज नृत्य करून सर्व गणेश भक्तांची मने जिंकली.

उत्तराखंड मधील ‘शिव महिमा’ नृत्य कलाकार ठरले...गणेश मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण.

वाशीम शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीला वर्षानुवर्षे एक वेगळेपण देणारे प्रमुख आकर्षण म्हणजे उत्तराखंड येथील ‘शिव महिमा’ नृत्य कलाकार... विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी शहरातील दिघेवाडी परिसरात हेडा परिवाराच्या वतीने मोठ्या उत्साहात काढल्या जाणाऱ्या मिरवणुकीत हा सांस्कृतिक देखावा गणेशभक्तांचे विशेष लक्ष वेधून घेतो. शिवमहिमेवरील नृत्यरचना, भक्तिरसाने ओतप्रोत गीत-संगीत आणि दिमाखदार सादरीकरणामुळे संपूर्ण वातावरणात आध्यात्मिकता आणि सांस्कृतिक रंग भरले जातात.

धाराशिवमध्ये हातलाई तलावात गणेश विसर्जनाला सुरुवात

धाराशिव मध्ये लाडक्या गणरायाला भक्तिभावाने निरोप द्यायला सुरुवात झाली . शहराजवळ असलेल्या हातलाई तलावामध्ये घरगुती गणपती आणि छोट्या मंडळाच्या गणरायाचं विसर्जन सुरू झाला असून दुपारनंतर मोठ्या मंडळाच्या गणरायाला वाजत गाजत मिरवणुकीने निरोप दिला जाणार आहे.धाराशिवमध्ये जवळपास शंभरहून अधिक मंडळाच्या गणेश मिरवणुका निघणार आहेत.

Indapur: इंदापूर पोलिसांनी दिला गणरायाला भावपूर्ण निरोप...

दहा दिवसांच्या सेवेनंतर लाडक्या गणपती बाप्पाला आज राज्यभरात मोठ्या जल्लोषात आणि भक्तीमय वातावरणात निरोप दिला जातोय.पुण्याच्या इंदापूर पोलिसांनी देखील लाडक्या गणपती बाप्पाला वाजत गाजत पारंपरिक वाद्याच्या गजरात निरोप दिला आहे. यावेळी गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया म्हणत इंदापूर पोलिसांनी पारंपरिक वाद्यावर चांगलाच ठेकाही धरला...

Lalbaugcha Raja Visarjan Live Update: लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणूकीत आदेश बांदेकर सहभागी

लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु झाली आहे. या मिरवणूकीत अभिनेता आदेश बांदेकरदेखील सहभागी झाले आहेत.

Ganpati Visarjan Live Update: जुहू चौपाटीवर गणपती विसर्जनाला सुरुवात

गिरगाव चौपाटीनंतर विसर्जनासाठी जुहू चौपाटी सर्वात मोठी चौपाटी

घरगुती गणपती विसर्जनाला जुहू चौपाटीवर सुरुवात

मोठ्या भक्तिभावाने लाडक्या गणरायाला भक्तांकडून दिला जातोय निरोप

सहा फुटाखालील मूर्ती विसर्जनासाठी पालिकेच्या के पश्चिम प्रभाग कार्यालयाकडून 3 कृत्रिम तलावाची निर्मिती

पालिकेच्या स्वयंसेवकांच्या सहकार्याने केले जातेय गणपती विसर्जन

Lalbaugcha Raja Visarjan Live Update: लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करुन मानवंदना

लालबागचा राजा मंडपातून बाहेर निघाला आहे. लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु झाली आहे. फुलांचा वर्षाव करुन लालबागच्या राजाला मानवंदना देण्यात आली आहे.

Mumbai Ganesh Visarjan Live Update: मुंबईतील गणपतींची विसर्जन मिरवणूक सुरु; VIDEO

मुंबईतील ३ महत्त्वाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक सुरु झालेली आहे. लालबागचा राजा, गणेश गल्वीचा राजा आणि चिंचपोकळीचा चिंतामणी विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहेय

Lalbaughcha Raja Live: बाप्पा निघाले गावाला, लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु, VIDEO

लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु झाली आहे. ढोल-ताशांच्या गजरात लालबागच्या राजाची मिरवणूक निघाली आहे.

मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपती समोर लेझीम वादन

लहान मुलांकडून लेझीम वादन

वादनाने जिंकले साऱ्यांचे मनं

लेझीमला हळगी आणि संबळ ची साथ

बेलबाग चौकात लहान मुलांकडून लेझीम वादन

Lalbaug Raja Visarjan Live Update: लालबागच्या राजावर फुलांचा वर्षाव

लालबागच्या राजावर फुलांचा वर्षाव करण्यात येत आहे. लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे.

लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु झाली आहे. लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणूकीत लाखो भाविक सहभागी झाले आहे.

Ratnagiri Ganesh Visarjan Live Update: रत्नागिरीत आज 36 हजार 466 गणपतींचं विसर्जन होणार

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 61 सार्वजनिक तर 36 हजार 405 घरगुती गणपतीचे विसर्जन होणार आहे. त्यासाठी पोलिसांसह सरकार यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. दुपारी चार नंतर जिल्ह्यातल्या बहुतांश भागात विसर्जनाला सुरुवात होईल. दरम्यान नागरिकांनी पारंपरिक पद्धतीने मिरवणुका काढाव्यात. कोणालाही त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी असा आवाहन पोलिसांनी केले आहे.

Pune Ganpati  Visarjan Live Update: पोलिसांकडून गुरुजी तालीम गणपतीची आरती

मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम बेलबाग चौकात दाखल

लक्ष्मी रोड वर मार्गस्थ होण्यापूर्वी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून गणपती ची आरती

गुरुजी तालीम गणपती ची मूर्ती आकर्षक फुलांच्या रथात विराजमान

Mumbai Ganesh Visarjan Live Update: परळच्या महाराजाची विसर्जन मिरवणूक सुरु

परळच्या महाराजाची विसर्जन मिरवणूक सुरु झाली आहे. या विसर्जन मिरवणूकीला हजारो भाविक उपस्थित आहेत.

Mumbai Ganesh Visarjan Live Update: परळचा सम्राट विसर्जनासाठी मार्गस्थ

मुंबईतील गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ झाले आहेत. परळचा सम्राट हा विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे.

Ganesh Visarjan: पुण्यातील  मानाचा तिसरा गणपती बेलबाग चौकात दाखल

मानाचा तिसरा गणपती बेलबाग चौकात दाखल

आकर्षक फुलांच्या रथात गुरुजी तालीम गणपती दाखल

गुरुजी तालीम मंडळ बेलबाग चौकात दाखल

बेलबाग चौकात गुलालाची मुक्त उधळण

ढोल ताशाच्या गजरात गुरुजी तालीम बेलबाग चौकात पोहचला

 Chinchpokli Chintamani: चिंचपोकळीचा चिंतामणी विसर्जनासाठी मार्गस्थ

चिंचपोकळीचा चिंतामणी विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे. चिंतामणीवर गुलाल आणि फुलांचा वर्षाव करत आहे. ढोल-ताशांच्या गजरात चिंतामणीची मिरवणूक काढली जात आहे.

पारंपारिक ढोल-ताशांच्या गजरात पुण्यातील गणपतींची विसर्जन मिरवणूक

पुणे आणि परंपरेचं वेगळंच नातं आहे. दरवर्षी पुण्यात ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचे स्वागत केले जाते. पुण्यातील गणपतीच्या विसर्जनासाठीही ढोल-ताशा पथक सज्ज झाले आहे. बाप्पाला मानवंदना दिली जात आहे.

गणपती विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस दलाकडून हेल्पलाइन नंबर जारी

गणपती विसर्जन मिरवणुकीच्या अनुषंगाने मुंबई पोलीस दलाकडून शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरिकांनी विसर्जन मिरवणुकीदरम्यान पोलिसांना सहकार्य करावे तसेच संशयास्पद वस्तू अथवा व्यक्ती आढळल्यास तातडीने कळवावे. आपत्कालीन परिस्थितीत हेल्पलाईन क्रमांक 100,103 आणि 112 आणि वर संपर्क साधावा.

Nagpur Ganesh Visarjan Live Update 2025: नागपूरच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

- नागपूरच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होतेय..

- आयोजकांच्या परिवारात शोक असल्याने अत्यंत साध्या पद्धतीने दिला जाणार बाप्पांना निरोप

- ढोल ताशा शिवाय साधेपणाने निघणार मिरवणूक

- बाप्पांची मूर्ती विसर्जन रथावर विराजमान

Ganesh Visarjan 2025 Live Update: तांबडी जोगेश्वरी मंडळासमोर विघ्नहर्ता ढोल ताशा पथकाकडून वादन

बेलबाग चौकात विघ्नहर्ता ढोल ताशा पथकाकडून तांबडी जोगेश्वरी मंडळासमोर वादन

पारंपरिक पद्धतीने वेशभूषा परिधान करून वादन

हत्तीची प्रतिकृती आणली असून त्यावर छत्रपत्री शिवाजी महाराज यांचा पुतळा

मावळ्यांचे वेशभूषा परिधान केलेली आहे

लालबागच्या राजाच्या मुख्यप्रवेशद्वारासमोर भीषण अपघात,२ वर्षीय मुलीचा मृत्यू तर ११ वर्षीय मुलगा गंभीर जखमी

लालबाग राजाच्या मुख्यप्रवेशद्वाराच्या विरूद्ध मार्गावर अज्ञात व्यक्तीच्या वाहनाच्या धडकेत एका २ वर्षाच्या मुलीचा मृत्यू, तर ११ वर्षीय मुलगा गंभीर जखमी

शनिवारी पहाटे ३ ते ४ च्या सुमारास ही घटना घडली असल्याची पोलिसांची माहिती

चंद्रा वजणदार असे मृत मुलीचे नाव असून या दुर्घटनेत शैलू वजणदार हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर परळच्या केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत

दोन्ही मुले लालबाग राजाच्या मुख्यप्रवेशद्वाराच्या विरूद्ध असलेल्या रस्त्याच्या कडेला झोपले असताना

अज्ञात व्यक्तीने त्याची गाडी मुलांवर घालून कोणतीही वैद्यकिय मदत न देता तिथून निघून गेला

याप्रकरणी काळाचौकी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात कलम 106, 125(इ), 281, 184,187 (बी.एन.एस) 2023 भा न्या सं अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Pune Ganesh Visarjan Live Update: पुण्यातील मानाचा पहिला कसबा गणपती बेलबाग चौकातून मार्गस्थ

मानाचा पहिला गणपती १०.१५ वाजता बेलबाग चौकातून पुढे मार्गस्थ

पुण्यातील सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

मानाचा पहिला कसबा गणपती पारंपरिक पालखीतून लक्ष्मी रोडच्या दिशेने मार्गस्थ

Lalbaugcha Raja Visarjan Live Update: लालबागच्या राजाची आरती संपन्न

लालबागच्या राजाची शेवटची आरती संपन्न झाली आहे. लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक थोड्याच वेळात सुरु होणार आहे. दहा दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर आज लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे भाविकांचा कंठ दाटून आला आहे.

Lalbaugcha Raja Visarjan 2025: लागबागच्या राजाची उत्तरपूजा सुरु

लालबागचा राजाची विसर्जनापूर्वीची उत्तरपूजा सुरु झाली आहे. थोड्याच वेळात लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ होणार आहे.

Ganesh Visarjan 2025:गणपतीच्या विसर्जनासाठी मुंबईत रांगोळी

लाडक्या गणपती बाप्पाचे आज विसर्जन आहे. गणपतीचे विसर्जन मोठ्या धामधुमीत होत आहे. यासाठी मुंबईच्या रस्त्यावर ठिकठिकाणी रांगोळी काढण्यात आली आहे.

 गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई  पोलिसांकडून हेल्पलाइन नंबर जारी

मुंबई पोलिसांनी ट्विटवरुन हेल्पलाइन नंबर जारी केला आहे. भक्तांना महत्त्वाचा सूचना दिल्या आहेत.

आज गिरगांव चौपाटी येथे गणेश विसर्जनाकरिता येणाऱ्या भाविकांना महत्वाच्या सूचना! कर्तव्यावरील पोलिसांनी दिलेल्या सुचनांचे पालन करा, मदतीकरिता बंदोबस्तावरील पोलिस, चौपाटीवरील पोलिस नियंत्रण कक्ष किंवा पोलिस हेल्पलाईन १०० / ११२ /१०३ यावर संपर्क करा.

Pune Ganesh Visarjan Live Update: पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणूकीत अजित पवार सहभागी

पुण्यातील पाचवा मानाचा केसरीवाडा गणपती मार्गस्थ

पुण्यातील पाचव्या मानाच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक सुरु झाली आहे. केसरीवाडा गणपती मार्गस्थ झाला आहे.

Pune Ganesh Visarjan Live Update: पुण्याचा पहिला मानाचा गणपती मंडई चौकात दाखल

पुण्याचं ग्रामदैवत आणि मानाचा पहिला कसबा गणपती मंडई चौकात दाखल

पालकमंत्री अजित पवार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते पार पडणार कसबा गणपतीची आरती

कसबा गणपतीची आरती पार पडल्यानंतर पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीला होणार सुरुवात

Mumbai Ganesh Visarjan Live Update: मुंबई-पुण्यात गणपती विसर्जनाची धामधूम

मुंबई-पुण्यातील गणपती बाप्पाचे आज विसर्जन होणार आहे. या विसर्जन मिरवणूकीत हजारो भक्त आहेत. बाप्पाच्या विसर्जनाची धामधूम पाहायला मिळत आहे.

पुण्यातील पहिला मानाचा कसबा गणपतीची मिरवणूक सुरु

आज लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे. आज पुण्यातील मानाच्या गणपतीचेदेखील विसर्जन होणार आहे. कसबा गणपतीची मिरवणूक सुरु झाली आहे.

Mumbaicha Raja 2025: मुंबईचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ

Kolhapur Live Update: कोल्हापुरातील मानाच्या तुकाराम माळी मंडळाच्या गणेशाची विसर्जन मिरवणूक सुरु

कोल्हापुरातील मानाच्या तुकाराम माळी मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणूक सुरू होत असते. यंदाही सकाळी नऊ वाजता पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते तुकाराम माळी मंडळाच्या गणेश मूर्तीचे पूजन करून या मिरवणुकीला सुरुवात होते. पारंपारिक वाद्यांच्या गजरामध्ये पालखीत विराजमान झालेल्या शाडू पासून तयार करण्यात आलेली श्री गणेशाची मूर्तीची मिरवणूक काढण्यात येते.

Mumbai Ganesh Visarjan Live Update 2025: तेजुकाया गणपतीची विसर्जन मिरवणूक सुरु

मुंबईतील गणपतींची विसर्जन मिरवणुक सुरु झाली. मुंबईच्या राजानंतर आता तेजुकाया गणपतीचीही विसर्जन मिरवणूक सुरु झाली आहे. ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचे विसर्जन होणार आहे. १० दिवस गणपतीची सेवा केल्यानंतर आता बाप्पाला निरोप देताना भाविक भावूक झाले आहेत.

Nagpur: नागपूरचा मानाचा गणपती असलेल्या नागपूरच्या राजाचे आज विसर्जन

* नागपूरच्या राज्याच्या आरतीला सुरुवात थोड्याच वेळात विसर्जन मिरवणूक निघणार..

* विसर्जन मिरवणूक रथाला फुलाने सजावटीचे काम सुरू,

* दहा दिवस विदर्भातून हजारो भाविकांनी घेतले नागपूरच्या राजाचे दर्शन..

मावळच्या दुर्गम भागातील उकसान पठार येथे महिलांनी पारंपारिक गाणी म्हणत, केले गणपती बाप्पाचे विसर्जन......

मावळ तालुक्यातील अतिशय दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उकसान पठार येथे बाप्पाचे मोठ्या भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आले. दरवर्षी सर्व ग्रामस्थांनी गणपती बाप्पाच्या मूर्तीची आपल्या घरी प्राण प्रतिष्ठा केली होती. दहा दिवस मनोभावे पूजा अर्चा करून आज जळ अंतकरणाने बाप्पाला निरोप दिला.. दरम्यान गावातील अनेक नागरिक पुणे मुंबई येथे नोकरी निमित्ताने राहत असतात. मात्र दरवर्षी न चुकता आपल्या गावाकडे गणपती उत्सवा निमित्ताने येत असतात. गणपती विसर्जनाच्या दिवशी या भागातील लहान थोर आदिवासी महिला पारंपरिक गीत गातात तर युवकांनी धनगर समाजाचे पारंपारिक गजनृत्य करतात..दहा दिवस बाप्पाची मनोभावे पूजा अर्चा केल्यानंतर आणि बाप्पाचे विसर्जन होणार आहे.

Pune Ganesh Visarjan Live Update: राष्ट्रीय कला अकादमी कडून बेलबाग चौकात भव्य रांगोळी

राष्ट्रीय कला अकादमी कडून बेलबाग चौकात भव्य रांगोळी

दर वर्षी बेलबाग चौकात मानाच्या गणपती समोर रांगोळ्या काढल्या जातात

रांगोळीतून सामाजिक संदेश देण्यात आला आहे

मुख्य मिरवणुकीला ९.३० वाजता सुरुवात होणार

Pune Ganesh Visarjan Live Update: केसरीवाडा गणपतीची मिरवणूक सुरु; लोकमान्य टिळकांनी सुरु केला होता सार्वजनिक गणेशोत्सव

लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा वारसा जपणारा पाचवा मानाचा केसरीवाडा गणपती… देशभक्ती, परंपरा आणि संस्कृतीचं दर्शन घडवणारी केसरीवाडा विसर्जन मिरवणुकीची तयारी झालीय

केसरीवाड्यातून निघणाऱ्या बाप्पाच्या मिरवणुकीत देशभक्तीची झलक नेहमीच झळकते. भगवा झेंडा, देशभक्तीपर घोषवाक्यं, पारंपरिक पोशाखातील स्वयंसेवक, आणि उत्साहाने नाचणारे कार्यकर्ते – हे केसरीवाडा गणपतीचं विसर्जन आगळं-वेगळं ठरवतं. टिळकांचा वारसा आजही या मिरवणुकीत अनुभवायला मिळतो.

Mumbai Raja Visarjan 2025 live updates : मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

गणेश गल्लीचा राजा म्हणजे मुंबईच्या राजाची मिरवणूक सुरु झाली आहे. ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप दिला जात आहे. मुंबईचा राजा मंडपातून बाहेर निघाला आहे. या विसर्जन मिरवणूकीला हजारो भक्त उपस्थित आहेत.

pune Ganesh Visarjan 2025 live updates :   कसबा गणपती पालखीमध्ये विराजमान, मिरवणूक होणार सुरु

पुण्यातील पहिला मानाच कसबा पेठ गणपतीची मिरवणूक थोड्याच वेळा सुरु होणार आहेत. गणपकी विसर्जनासाठी पालखीमध्ये विराजमान झाला आहे.

pune Ganesh Visarjan 2025 live updates :  तांबडी जोगेश्वरी पुण्यातील दुसऱ्या मानाच्या गणपतीची मिरवणूक थोड्याच वेळात निघणार

तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या मिरवणुकीला काहीच वेळात सुरवात होणार असुन ढोल-ताशांचा दणदणाट, तर महिलांच्या ओव्या, भजनी मंडळींचा गजर आणि नऊवारी साडीतुन महिलांचे पथक प्रमुख आकर्षक रहाणार असुन बाप्पाची मिरवणूक हि पारंपरिक दिंडी पद्धतीची मिरवणूक या गणपतीची खास परंपरा आहे.

pune Ganesh Visarjan 2025 live updates :  पुण्यातील तिसरा मानाच्या गुरुजी तालीम गणपतीच्या विसर्जन मिरवणूकीसाठी रथ सजला

सांस्कृतिक वारसा आणि ऐतिहासिक शिस्त याचं दर्शन गुरुजी तालीम गणपतीच्या मिरवणुकीत घडतं. यंदाच्या वर्षी गुरुजी तालीम मंडळाकडुन काशी विश्वनाथ मंदिराचा देखावा साकारण्यात आला होता त्यामुळे आज बाप्पाला निरोप देत असताना बाप्पाचा रथावर काशी विश्वनाथ मंदिराची प्रतिमा आकर्षक फुलांच्या सजावटीत करण्यात आली असुन हा रथ आता सज्ज झालाय तर, झांज-लेझीम पथकांचा मंजुळ नाद, पारंपरिक पोशाख, आणि शिस्तबद्ध मिरवणूक – हा वेगळाच अनुभव देणारा ठरतो.

Dagdusheth Halwai Ganesh Visarjan Live Update: अजित पवारांकडून दगडूशेठ गणपतीची पूजा

आज बाप्पाचे विसर्जन होणार आहे. दरम्यान, पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीची पूजा सुरु झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ही पूजा होत आहे.

pune Ganesh Visarjan 2025 live updates : कसबा गणपतीची विसर्जन मिरवणूक थोड्याच वेळात निघणार

पुण्यातील मानाचा पहिला गणपती असणाऱ्या कसबा पेठ गणपतीची मिरवणूक थोड्याच वेळात निघणार आहे. सध्या कसबा पेठ गणपतीची पूजा सुरु आहे.

Ganesh Visarjan Live Update: परळच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

मुंबईतील परळच्या राज्याची विसर्जन मिरवणूक सुरु झाली आहे. गणपतीला मोठ्या भक्तीभावाने निरोप दिला जात आहे. यानंतर मुंबईतील इतर गणपतींची मिरवणूक थोड्या वेळात निघणार आहे.

pune Ganesh Visarjan 2025 live updates : अजित पवार श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात

उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दाखल झाले आहेत. अजित पवारांच्या हस्ते मुख्य मंदिरात होणार पूजा आणि आरती होणार आहे. थोड्याच वेळात दगडूशेठ बाप्पा मुख्य मंदिरातील येणार आहेत. अजित पवार यांच्यासोबत सुनेत्रा पवार देखील दगडूशेठ मंदिरात उपस्थित आहेत. अजित पवार सपत्नीक दगडूशेठ बाप्पांची आरती करणार आहेत.

Mumbai Ganesh Visarjan 2025 live updates : लालबागच्या राजाची मिरवणूक कधी निघणार?

लालबागच्या राजाची उत्तर पूजा सकाळी साडेदहा वाजता सुरू होईल. त्या नंतर लालबागच्या राजाची आरती होईल. स्वरांजली बँड पथक द्वारे मानवंदन देण्यात येईल आणि विसर्जन मिरवणूक सुरुवात होईल.

तरुणाई मिरवणुकीसाठी मोठ्या संख्येने हजर आहेत. दोन ते तीन तास लालबागच्या राजाची मिरवणूक ही मार्केट परिसरात असेल.

pune Ganesh Visarjan 2025 live updates : गुरुजी तालीम गणपती मानाचा तिसरा गणपती

सांस्कृतिक वारसा आणि ऐतिहासिक शिस्त याचं दर्शन गुरुजी तालीम गणपतीच्या मिरवणुकीत घडतं. यंदाच्या वर्षी गुरुजी तालीम मंडळाकडुन काशी विश्वनाथ मंदिराचा देखावा साकारण्यात आला होता त्यामुळे आज बाप्पाला निरोप देत असताना बाप्पाचा रथावर काशी विश्वनाथ मंदिराची प्रतिमा आकर्षक फुलांच्या सजावटीत करण्यात आली असुन हा रथ आता सज्ज झालाय तर, झांज-लेझीम पथकांचा मंजुळ नाद, पारंपरिक पोशाख, आणि शिस्तबद्ध मिरवणूक – हा वेगळाच अनुभव देणारा ठरतो.

pune Ganesh Visarjan 2025 live updates : तांबडी जोगेश्वरी गणपती मानाचा दुसरा गणपती

तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या मिरवणुकीला काहीच वेळात सुरवात होणार असुन ढोल-ताशांचा दणदणाट, तर महिलांच्या ओव्या, भजनी मंडळींचा गजर आणि नऊवारी साडीतुन महिलांचे पथक प्रमुख आकर्षक रहाणार असुन बाप्पाची मिरवणूक हि पारंपरिक दिंडी पद्धतीची मिरवणूक या गणपतीची खास परंपरा आहे.

pune Ganesh Visarjan 2025 live updates : पुण्याच्या गणेशोत्सवातील पहिला मानाचा कसबा गणपती

पहिला मानाचा कसबा गणपतीची विसर्जन मिरवणूक चांदीच्या पालखीतुन निघणार असुन ढोल-ताशांच्या गजरात विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ होतो. लाल-पांढऱ्या पारंपरिक वेशभूषेत कार्यकर्त्यांची फौज, ढोल, लेझीम, झांज पथकांचा गजर आणि 'ग्रामदैवताला निरोप' देणाऱ्या भाविकांची गर्दी परंपरा, भक्ती आणि ऐतिहासिक वारसा आजही कायम असणार असुन हे दृश्य विसर्जन मिरवणुकीत रंगत आणणारं असतं.

Anant Chaturdashi 2025 live updates : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी..., लाडक्या बाप्पाला आज निरोप

Summary

सर्वांच्या लाडक्या सुखकर्ता, विघ्नहर्ता बाप्पाच्या स्वागतासाठी ३ आठवड्यांपासून राज्यभरात लगबग सुरू होती. घराघरात चैतन्य घेऊन आलेल्या गणरायाची आराधना करताना १० दिवस कधी संपले, कळलेच नाही. या आनंदोत्सवाची आज सांगता होणार आहे. 'गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला…' अशा घोषणा देत शहरातील मानाचे गणपती, विविध मंडळे आणि नागरिक आज लाडक्या बाप्पाला निरोप देणार आहेत. विसर्जन मिरवणुकीत, बाप्पाला निरोप देण्यासाठी पावसाच्या सरीही हजेरी लावणार असल्याचे वेधशाळेने सांगितले आहे.

आज, शनिवारी, महाराष्ट्रात अनंत चतुर्दशीच्या शुभ मुहूर्तावर गणपती विसर्जनाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. लाखो भाविक आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देत आहेत. गणेशोत्सवाचा समारोप करताना, मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूरसह राज्यभरात मिरवणुका निघाल्या असून, ढोल-ताशांच्या गजरात आणि "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या" च्या जयघोषात बाप्पांचे विसर्जन होत आहे. मुंबई, पुण्यासह राज्यभरात पोलिसांचाही तगडा बंदोबस्त करण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com