Ahmednagar News: कर्जत जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार कर्जत-जामखेडमध्ये एमआयडीसी सुरू होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पंरतु, एमआयडीसीला मिळणारी जमीन नीरव मोदी यांची असल्याचा थेट आरोप आमदार राम शिंदे केला आहे. (Latest Marathi News)
आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांच्या या आरोपामुळे एकच खळबळ उडाली असून उद्योग मंत्री उदय सामंत यांनी कर्जतला एमआयडीसी (MIDC) करण्याबाबत शासन सकारात्मक आहे. मात्र नीरव मोद यांच्या नावाने जमीन असल्याचे समोर आले. मात्र, येथे जमीन घेतलेला हा नीरव मोदी लंडनला पळून गेलेला फरार नीरव मोदी आहे की स्थानिक आहे याची माहिती घेतली जाईल. तसेच, सर्व नावांची सखोल चौकशी करण्यात येईल असे सांगितल्याने एमआयडीसी प्रस्ताव पुन्हा पुढे ढकलला गेला.
हिरे व्यापारी निरव मोदी यांच्या नावाने कर्जत तालुक्यातील खंडाळा, गोयकरवाडी,कापरेवाडी, वाघनळी या तीन गावांच्या हद्दीत 2008 मध्ये जवळपास 250 एकर जमीन खरेदी करण्यात आली आहे. मात्र निरव मोदी पळून गेल्यानंतर इडीने ही जामीन जप्त केली. काही वर्षांपूर्वी या ठिकाणी स्थानिक किराणा नागरिकांनी काही मुक्ती आंदोलन करत ही जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्नही केला होता. मात्र ही जमीन ईडीच्या (ED) ताब्यात असल्याने पुढे त्याच्यावर काहीही कारवाई झाली नाही.
राम शिंदे यांनी निरव मोदीचे नाव घेतल्यामुळे पुन्हा ही जमीन प्रकाश झोतात आली असून नेमकी किती जमीन या एमआयडीसीसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. याबाबत अद्यापही सरकार दरबारी याची माहिती मिळाली नसली तरी यामध्ये निरव मोदीचे नाव घेऊन एमआयडीसीला मंजुरी मिळू नये असाच प्रयत्न भाजप आमदार राम शिंदे (Ram Shinde) तर करत नाही ना असा सवाल आता समोर येऊ लागला आहे.
एमआयडीसी प्रकरणी आता कर्जत जामखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात सह्यांची मोहीम राबविण्यात येत असून दोन दिवसापूर्वी कर्जत जामखेड तालुक्यातील अनेक गावात या प्रश्न साठी रस्ता रोको करण्यात आला होता. तर आता मुंबई येथे जाऊन आरपारची लढाई लढण्याचा इशारा राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दिला आहे. त्यामुळे कर्जत जामखेडच्या एमआयडीसीचा प्रश्न आता दिवसात दिवस गंभीर बनत चालला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.