Mumbai Local Mega Block: मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

Mumbai Local Mega Block Sunday 30 July 2023: उद्या म्हणजेच रविवारी (३० जुलै) लोकलच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर विविध आभियांत्रिक आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Mumbai Local Mega Block Sunday 30 July 2023
Mumbai Local Mega Block Sunday 30 July 2023Saam TV
Published On

Mumbai Local Mega Block Sunday 30 July 2023: मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर आहे. उद्या म्हणजेच रविवारी (३० जुलै) लोकलच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर विविध आभियांत्रिक आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वेप्रशासनाकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. आला आहे.

Mumbai Local Mega Block Sunday 30 July 2023
Buldhana Bus Accident: बुलढाण्यात दोन खासगी बस एकमेकांना धडकल्या; भीषण अपघातात ६ प्रवाशांचा जागीच मृत्यू

रविवारी घेण्यात येणाऱ्या मेगाब्लॉकमुळे लोकल विलंबाने धावणार आहेत. एकीकडे मुंबईसह उपनगरात कोसळणारा पाऊस आणि त्यातच रविवारी जारी करण्यात आलेला मेगाब्लॉक यामुळे मुंबईकरांनी काम असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या ठाणे – कल्याणदरम्यान पाचवी आणि सहावी मार्गिका रविवारी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. ब्लॉक कालावधीत सीएसएमटीच्या दिशेकडे जाणाऱ्या आणि सीएसएमटीवरून सुटणाऱ्या लांबपल्ल्यांच्या गाडय़ा १० ते १५ मिनिटे विलंबाने धावतील. सकाळ ९.५० ची वसई रोड – दिवा मेमू कोपपर्यंत चालवण्यात येईल.

Mumbai Local Mega Block Sunday 30 July 2023
Maharashtra IMD Alert: राज्यात आज अतिमुसळधार पावसाचा इशारा; तब्बल १९ जिल्ह्यांना यलो अलर्ट

तर हार्बर मार्गावरील पनवेल – वाशीदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.५ ते दुपारी ४.५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत पनवेलवरून सीएसएमटीला जाणारी आणि सीएसएमटीवरून पनवेल आणि बेलापूरला जाणारी लोकल सेवा रद्द केली आहे.

याशिवाय पश्चिम मार्गावरील मरिन लाइन्स ते माहीम डाऊन धीम्या मार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत डाऊन धीम्या मार्गावरील लोकल मरिन लाइन्स ते माहीम स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वेचं वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com