Buldhana Bus Accident: बुलढाण्यात दोन खासगी बस एकमेकांना धडकल्या; भीषण अपघातात ६ प्रवाशांचा जागीच मृत्यू

Buldhana Malkapur Two Private Bus Accident: बुलढाणा जिल्ह्यात दोन खासगी बसचा भीषण अपघात, ६ प्रवाशांचा जागीच मृत्यू, २५ ते ३० जण जखमी
Buldhana Accident News Two private buses collided in Malkapur city 5 passengers died on the spot and 25 to 30 injured
Buldhana Accident News Two private buses collided in Malkapur city 5 passengers died on the spot and 25 to 30 injuredSaam TV
Published On

संजय जाधव, साम टीव्ही

Buldhana Malkapur Two Private Bus Accident: बुलढाणा जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. मलकापूर शहरातील हायवे क्रमांक सहा वरती दोन खासगी ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक झाली.

या दुर्घटनेत ६ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथामिक माहिती आहे. तर २५ ते ३० प्रवासी जखमी झाले आहेत. ही दुर्देवी घटना शनिवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास घडली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

Buldhana Accident News Two private buses collided in Malkapur city 5 passengers died on the spot and 25 to 30 injured
Maharashtra IMD Alert: राज्यात आज अतिमुसळधार पावसाचा इशारा; तब्बल १९ जिल्ह्यांना यलो अलर्ट

बुलढाण्यात खासगी बसचा अपघात होण्याची महिनाभरातील ही दुसरी घटना आहे. या घटनेनं मोठी खळबळ उडाली असून खासगी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, अमरनाथ येथून ३५ ते ४० प्रवाशांना घेऊन खासगी बस हिंगोलीच्या दिशेने निघाली होती. त्याचवेळी दुसरी बस नागपूरवरून २५ ते ३० प्रवाशांनी घेऊन नाशिकच्या दिशेने येत होती.

दरम्यान, दोन्ही बस मलकापूर शहरातून (Buldhana Accident News) जाणाऱ्या हायवे क्रमांक सहा वरती समोरासमोर धडकल्या. हा अपघात इतका भीषण होता, की दोन्ही ट्रॅव्हल्सचा चक्काचूर झाला. या भीषण अपघातत ६ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन्ही ट्रॅव्हल्स मधील ते २० ते २५ प्रवासी जखमी आहे.

Buldhana Accident News Two private buses collided in Malkapur city 5 passengers died on the spot and 25 to 30 injured
Chhota Rajan News: दत्ता सामंत हत्येप्रकरणी छोटा राजनची निर्दोष मुक्तता, 26 वर्षांनंतर निकाल

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मलकापूर शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने पोलिसांनी आपल्या वाहनातून जखमींना घेऊन मलकापूर रुग्णालयात दाखल केले.

जखमींचा जीव वाचवण्यासाठी पोलीस निरीक्षक अशोक रत्नापारखी यांनी माणुसकीचे दर्शन घडवले. दरम्यान, अपघातातील काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना बुलढाणा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. महिनाभरातच बुलढाणा जिल्ह्यात खासगी बसचा दुसरा भीषण अपघात झाल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com