Maharashtra Politics Saam Tv
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Politics: नवाब मलिक रिंगणात, महायुतीत वाद; भाजप प्रचार करणार नाही, आशिष शेलारांचं वक्तव्य

Mankhurd Assembly Election 2024: मानखुर्दमधून अजित पवार गटाचे नवाब मलिक यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. पंरतु त्यांचा प्रचार भाजप करणार नसल्याचे सांगितले आहे.

Tanmay Tillu

नवाब मलिकांच्या उमेदवारीवरुन महायुतीत बेबनाव दिसून येतोय. नवाब मलिक हे महायुतीचे उमेदवार नसून भाजप त्यांचा प्रचार करणार नसल्याचं,आशिष शेलार यांनी म्हटलंय. तर मलिकांवरील आरोप सिद्ध झाले नसून त्यांची उमेदवारी मागे घेणार नसल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलंय. (Nawab Malik)

मलिक रिंगणात, महायुतीत वाद

मानखुर्दमध्ये महायुतीतच 'काँटे की टक्कर'

राष्ट्रवादी काँग्रेसचे मानखूर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार नवाब मलिक यांच्यावरून महायुतीत वादाची ठिणगी पडलीये.. भाजप आणि शिवसेनेने त्यांच्याविरोधात प्रचार करणार असल्याचं स्पष्ट केलंय. राष्ट्रवादीचे नेते त्यांच्या उमेदवारीवर ठाम आहे. प्रफुल पटेल यांनी तर यावरून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बोट दाखवलंय..त्यावरुन महायुतीत वाद पेटलाय.

आशिष शेलार नवाब मलिकांचा प्रचार करणार नाही.

अजित पवारांनी (Ajit Pawar) मलिकांना उमेदवारी बहाल केल्यामुळे भाजप-शिवसेनेची साफ गोची झालीये.एका बाजूला वोट जिहाद, बटेंगे तो कटेंगे, असे मुद्दे उचलून धरायचे आणि दुसऱ्या बाजूला आरोप केलेल्या मलिकांसारख्यांनाच उमेदवारी द्यायची यावरुन विरोधकांनी महायुतीला टार्गेट केलं असतं... याची जाणीव झाल्यामुळे मलिकांच्या विरोधात शिवसेनेने उमेदवारी जाहीर केलीये. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात सांगली पॅटर्न गाजला. तसा विधानसभा निवडणुकीत मानखुर्द पॅटर्न गाजणार अशी शक्यता आहे.त्यामुळे या मतदारसंघात महायुतीतच जोरदार टक्कर पाहायला मिळणार आहे. (Mankhurd Assembly Election)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News : पुण्यात विजयासाठी महायुतीची रणनीती ठरली; मित्र पक्षाला एकत्र घेत बांधली समन्वयाची मोट

IPL 2025 Auction: कोण मालामाल होणार! पंत, राहुल ते अय्यर; भारताच्या 'या' खेळाडूंची बेस प्राईज सर्वाधिक

Maharashtra News Live Updates : भाजपचे माजी आमदार वैभव पिचड यांना अश्रू अनावर

Nevasa Vidhan Sabha : माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांची भाजपमधून हकालपट्टी; बंडखोरी करत भरलेला अर्ज कायम ठेवल्याने कारवाई

Mobile In Marathi: मोबाईलला मराठीत काय म्हणतात?

SCROLL FOR NEXT