Maharashtra Election: राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात ४ हजार १४०उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

Maharashtra Assembly Election: विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार सुरू झालाय. आज उमेदवारी अर्ज घेण्याच्या दिवशी २ हजार ९३८ उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतलीय.
Maharashtra Election: राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात ४ हजार १४०उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
Published On

राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी २८८ मतदारसंघात ७ हजार ७८ उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र वैध ठरले होते. त्यातील आज दि. ४ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत २ हजार ९३८ उमेदवारांनी माघार घेतली आहे. आता राज्यात ४ हजार १४० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिलीय. राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदार संघात एकाच टप्प्यात २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. तर २३नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी होणार आहे.

अनेक बंडखोरांनी रिंगणात कायम राहण्याची भूमिका घेतल्याने महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्हींची डोकेदुखी वाढलीय. राज्यभरातील जवळपास प्रत्येक जिल्ह्यात बंडखोर उमेदवार रिंगणात असल्याने सर्वच पक्षांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे.

नाशिक जिल्ह्यातील नांदगाव- मनमाड मतदारसंघात आमदार सुहास कांदे यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय. दिंडोरीत शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये मैत्रीपूर्ण लढत असणार आहे. पुणे जिल्ह्यातून ४८२ उमेदवारांनी अर्ज दाखल केला होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी १७८ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेत.

Maharashtra Election: राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात ४ हजार १४०उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
Maharashtra Politics: राजकारणात नव्या समीकरणांची नांदी? एकनाथ शिंदे आणि शरद पवार एकत्र येणार?

वाशिम विधानसभा मतदारसंघातही बंडखोरी कायम आहे. महाविकास आघाडीकडून डॉ.सिद्धार्थ देवळे यांना शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आलीय. मात्र येथे ठाकरे गटातील मदन उर्फ राजा भैया पवार हे निवडणुक लढवण्यास इच्छुक होते. त्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. श्रीरामपूर विधानसभेत महायुतीत बंडखोरी कायम आहे. भाऊसाहेब कांबळे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय.

मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतरही कांबळे यांची माघार घेतली नाही. शिंदे गटाकडून भाऊसाहेब कांबळे तर अजित पवार गटाकडून लहू कानडे यांना देण्यात एबी फॉर्म देण्यात आले होते. आज पक्षाकडून कांबळे यांना उमेदवारी मागे घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com